या पक्षाचा होणार मुख्यमंत्री ; नवाब मलीक

0
457
Google search engine
Google search engine

मुंबई – शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाशिवआघाडीबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यात महाशिवआघाडी सरकार आल्यास त्या सरकारमध्ये शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद जाणार असल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे. तसेच

सत्तास्थापनेसाठी संभाव्य महाशिवआघाडीच्या वाटाघाटीवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात भेट होणार असल्याची माहिती आहे. पुढील दोन ते तीन दिवसात ही बैठक होणार असून यामध्ये समान कृती कार्यक्रम आणि पद व जबाबदारीचे वाटप याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान किमान समान कार्यक्रमासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची 5-5 जणांची समिती तयार करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अजितदादा पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नवाब मलिक तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टावार, माणिकराव ठाकरे समितीत असण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेनेचेही काही नेेेते यामध्ये समाविष्ट होणार आहेत. त्यामुळे या तिन्ही पक्षांच्या आगामी भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.