बाजार समित्या बरखास्त करण्याचा सरकारचा घाट-युवक काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके यांचा सवाल.

0
606
Google search engine
Google search engine

अकोट : प्रतिनिधी

बाजार समित्या बरखास्तीची भाषा करणारे सरकार शेतकऱ्यांचे कि उद्योगपतींचे असा सवाल महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके यांनी काल शुक्रवारी अकोट येथे आयोजीत पत्रकार परीषदेत केला .

यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना ते म्हणाले दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशांमध्ये ऑनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार
(ई-नाम) प्रभावीपणे राबविण्यासाठी बाजार समित्या बरखास्त करण्यासंदर्भात आम्ही राज्यांशी बोलत आहोत असे प्रतिपादन केले होते. या केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका करताना कपिल ढोके ह्यांनी बाजार समित्या बरखास्त करण्याचा सरकारचा घाट असल्याचा सवाल पत्रकारांशी बोलतांना उपस्थित केला.

बाजार समित्यांची कार्यपद्धती आणि कामकाज आता प्रचंड अडचणीचे झाले आहे शेतकऱ्यांना भाव देण्यास असमर्थ ठरत आहे. असा ठपका ठेवून केंद्र सरकार बाजार समित्या बरखास्त करायला निघालेले आहे आणि बाजार समिती बरखास्त करून जो पर्याय आपल्यासमोर ठेवतात तो ऑनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार (इ-नाम) हे प्रचंड भ्रष्टाचारी आणि प्रचंड अयशस्वी ठरु शकते असी टिका सुद्धा कपिल ढोके ह्यांनी केली.

राज्यांमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळावा शेतकऱ्यांना आपला माल बाजारपेठेत नेऊन विकता यावा ह्या प्रांजळ उद्देशांने कृषी उत्पन्न बाजार समिती नावाची संकल्पना अस्तित्वात आली. आणि राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे कृषी उत्पन्न बाजार समिती या संस्थेशी एक भावनिक नातं निर्माण झालं.

व्यवस्था उभी करताना अनेक वर्षे लागतात परंतु व्यवस्था बरखास्त करायला काही लागत नाही.परंतु त्या व्यवस्थे मागे असलेल्या लोकभावना लक्षात घेणं हेच लोकशाहीत महत्त्वाचं असावं.

केंद्र सरकारच्या अनेक चुकीच्या धोरणांमुळे बाजार समित्या खिळखिळ्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात परंतु आज खऱ्या अर्थाने कृषी उत्पन्न बाजार समित्या सक्षम करण्याची गरज असतांना त्या बाजार समित्या बरखास्त करण्याचा घाट घालुन इ-नाम सारख्या किचकट आणि शेतकऱ्यांसाठी प्रचंड त्रासदायक असणाऱ्या व्यवस्थेची शेतकऱ्यांना सक्ती झाल्यास शेतकऱ्यांना संकटात लोटल्यासारखे आहे.

अजूनही खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत पोहोचायला वेळ लागतो आहे. तंत्रज्ञानाचे पूर्ण शिक्षण शेतकर्यांपर्यंत पोहोचलेले नाही अशा अवस्थेत त्यांना ऑनलाइन शेतमाल विकण्याची सक्ती केल्यास आणि त्यांच्या समोरचा बाजार समिती नावाचा हक्काचा पर्याय हिरावुन घेतल्या जाऊ शकते.
राष्ट्रीय कृषी ऑनलाइन बाजार हा छोट्या व्यापाऱ्यांच्या सुद्धा हिताचा नाही यामध्ये केवळ देशातील बड्या उद्योगपतींचा फायदा आहे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचा माल हा उद्योगपतींच्या घशात घालण्याचा केंद्र सरकारचा घाट आहे अशी टीका सुद्धा ढोके ह्यांनी केली.

आगामी काळात केंद्र सरकारने बाजार समित्या बरखास्त करून इ-नामची सक्ती केल्यास देशातील- राज्यातील शेतकरी सरकारला माफ करणार नाहीत.
सर्व शेतकरी बांधवांनी या निर्णयाविरुद्ध एकत्र येण्याची गरज आहे.असे मत सुद्धा युवक काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.यावेळी पत्रकार परीषदेला प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके यांच्यासह युवक कॉंग्रेस प्रदेश सचिव निनाद मानकर,माजी आकोट विधानसभा अध्यक्ष प्रतिक गोरे यांनी संबोधित केले.