सेदानी इंग्लिश स्कुल मध्ये बालदिनाची धमाल

0
463

आकोटः प्रतीनिधी-

स्थानिक पोपटखेड मार्गावरील सेदानी इंग्लिश स्कुल व ज्यु. कॉलेज मध्ये पं जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस तथा बालदिना निमित्त धमाल खेळ सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होते.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मुख्याध्यापक प्रशांत मंगळे प्राथ. मुख्याध्यापीका स्नेहल अभ्यंकर यांची उपस्थीती होती.तर अध्यक्षस्थानी प्राचार्य विजय भागवतकर यांची उपस्थीती लाभली होती.

कार्यक्रमाच्या सुरवातीस चाचा नेहरुंच्या प्रतिमा पुजन करुन हार फुले वाहण्यात आली.तसेच चाचा नेहरुंची वेशभुषा साकारणाऱ्या बाल विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.तर प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले.प्राथमिकच्या शिक्षकांनी विविधतेत एकता ही संकल्पना भारतातील विविध भाषा पेहरावातील व्यक्तीरेखांंतुन सादर केली.तर माध्यमिकच्या शिक्षकांनी हरवलेले बालपण व आजचे मोबाईलच्या दुनियेतील बालपण दर्शवणारी नृत्य नाटीका सादर केली .

विद्यार्थ्यांच्या आनंददायी बालदिनासाठी शिक्षकांनी सादर केलेल्या या कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडुन वाहत होता.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पंकज अंबुलकर साक्षि पाटील यांनी तर आभार प्रदर्शन साक्षि पाटील यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक शिक्षिकांनी परिश्रम घेतले.