ॲलेक्स च्या माध्यमातून आरोग्य सेवा जनसामान्य पर्यंत पोहचेल― प्रदीपभैय्या मुंडे

0
812
Google search engine
Google search engine
*ॲलेक्स च्या माध्यमातून आरोग्य सेवा जनसामान्य पर्यंत पोहचेल― प्रदीप भैया मुंड*
मुक्ताई अलेक्स आयुर्वेदिक प्रॉडक्टसचा शुभारंभ संपन्न
परळी/प्रतिनिधी
आरोग्य सेवा ही ईश्वरसेवा असून ही सेवा ॲलेक्स च्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत पोहोचेल व आयुर्वेदिक औषधी च्या माध्यमातून रोग मुळापासून बरा होण्यास मदत होते म्हणून आरोग्य जपणे काळाची गरज असून ॲलेक्स च्या माध्यमातून ही सेवा गरजू रुग्णांना पर्यंत पोहोचेल असे प्रतिपादन  जि. प. सदस्य प्रदीप भैया मुंडे यांनी केले.
     मुक्ताई आयुर्वेदिक प्रोडक्ट चा शुभारंभ दि. 16 नोव्हेंबर रोजी जि. प .सदस्य प्रदीप भैय्या मुंडे यांच्या शुभहस्ते उद्घाटन  संपन्न झाले. मुक्ताई अलेक्स आयुर्वेदिक प्रोडक्स हे मूळव्याध मुतखडा जुना खोकला गुप्त रोगावर खात्रीशीर आयुर्वेदिक औषधी दिले जाणार असून त्या औषधी द्वारे अनेक रोगांपासून जनसामान्य माणसाचा बचाव होणारा आहे त्यामुळे दवाखान्यामध्ये लागणारे पैसे वाचण्यास मदत होईल म्हणून शहरातील तसेच ग्रामीण भागातील लोकांनी अलेक्स आयुर्वेदिक प्रोडक्सचा अनुभव घ्यावा असे आवाहन जि.प. सदस्य प्रदीप भैय्या मुंडे यांनी केले.
     यावेळी कार्यक्रमास मुक्ताई आयुर्वेदिक प्रोडक्टस चे मालक संतोष(राजाभाऊ) आघाव,भोपळा सरपंच भागवत मुंडे, मधुकर ढाकणे, प्रा. संदिपान मुंडे ,नितीलभैया ढाकणे,अनंत महाराज मुंडे,बाबासाहेब मुंडे, रणजित रायभोळे, बबलू मुंडे, मिसाळ साहेब,गायकवाड सर,चेतन सर,अनिल चव्हाण सर,राजकुमार चव्हाण, देशमुख सर,काडके सर,विशाल मुंडे,महादेव फड,राजाभाऊ मुंडे, महारुद्र मुंडे आदी उपस्थित होते.