बच्चूभाऊ कडू यांच्या अटकेच्या निषेधार्थ प्रहार ने उपविभागीय अधिकाऱ्याना दिले निवेदन

0
1304

दर्यापूर :-:-    यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मालाची कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे, यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या हवालदिल झालेला आहे आधीच कर्जाचा बोजा असताना झालेली पिकांची नासाडी आणि शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अल्प दर पाहता कुटुंबाचे पालन पोषण करण्याचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे शासनाकडून पिकाच्या झालेल्या नासाडीचे पंचनामे करण्यात आले नसताना शेतकऱ्यांना अजूनही शासनाकडून मदतीची घोषणा करण्यात आलेली नाही सध्याची राजकीय परिस्थिती बघता नुकत्याच झालेल्या निवडणुकांनंतर नियोजित कालावधीत अजूनही सरकार स्थापन झालेले नसल्यामुळे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे असे असताना शेतकर्‍यांना शासनाकडून मदत जाहीर करण्याची संपूर्ण जबाबदारी राज्याचे प्रमुख सचिव आणि राज्यपालांची आहे मात्र अजून पर्यंत राज्यपालांनी याबाबत कुठलीही कारवाई केली नसल्यामुळे आमदार बच्चू कडू यांनी यासाठी मुंबई येथील राजभवनावर शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी दिनांक 14 –  11-  2019 रोजी आंदोलनात्मक मोर्चा काढला होता यासाठी राज्यभरातून हजारो कार्यकर्ते हजर होते शेतकऱ्यांच्या मागणीसाठी राज्यपालांनी आमदार बच्चू कडू यांना चर्चेसाठी न बोलाविता त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली यादरम्यान पोलिसांकडून अमानुषपणे पुरुष आणि महिलांवर लाठीहल्ला करण्यात आला,  हे भारतीय राज्यघटनेला अनुसरून नव्हे,  यामुळे राज्यपालांकडून हुकूमशाही पद्धतीने महाराष्ट्रातील कारभार सुरू केल्याचे दिसून येते. याचा निषेध करीत दर्यापूरतील प्रहार ने उपविभागीय अधिकाऱ्यांना निषेधाचे निवेदन दिले व जोरदार घोषणाबाजी केली ,.यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख प्रदिप वडतकर सह दर्यापूर विधानसभा संघटक प्रदीप चौधरी,  उपजिल्हाप्रमुख महेश कुरळकर डॉक्टर दिनेश म्हाला,  सुधीर पवित्रकार बापूसाहेब साबळे अनुप गावंडे अनुराग मानकर गजानन मोहोड रामकृष्ण काळे पप्पू पाटील गावंडे मंगेश सावळे सुनिल पुरी, अभिजीत घटाळे यांच्यासमवेत निवेदन दिले…….