*पत्रकार सुरक्षा समितीच्या कायदेशीर सल्लागार पदी संतोष कुलकर्णी यांची निवड *

0
831
Google search engine
Google search engine

सोलापूर :- पत्रकार सुरक्षा समिती ची सोलापूर येथील शासकीय विश्रांमग्रह येथे बैठक घेण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर अध्यक्ष दामोदर पासकांती होते या बैठकीत पत्रकारांच्या विविध विषयावर चर्चा होऊन पत्रकार सुरक्षा समितीच्या कायदेशीर सल्लागार पदी अडव्होकेट संतोष कुलकर्णी यांची निवड करण्यात आली यावेळी संतोष कुलकर्णी यांनी बोलताना सांगितले की हल्ली महाराष्ट्र मध्ये पत्रकारवर खंडणी तसेच सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले असून अश्या पत्रकारांचे भवितव्य अंधकारमय होत आहे त्यामुळे पत्रकार साठी कायदेशीर मार्गाने मी न्यायालय मध्ये बाजू मांडणार असून अश्या खोटे गुन्हे दाखल झालेल्या पत्रकारांसाठी मी कायदेशीर लढा उभा करणार असल्याचे सांगितले
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने अडव्होकेट संतोष कुलकर्णी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार जिल्हा कार्याध्यक्ष गोविंद शेंडगे शहर अध्यक्ष दामोदर पासकांती संपर्क प्रमुख राजेंद्र पवार संघटक जाकीर हुसेन हुंडेकरी वैजिनाथ बिराजदार उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष भगवान कदम उपाध्यक्ष प्रभाकर एडके इम्तियाज तांबोळी तानाजी माने बाबा काशीद अल्ताफ शेख राजशेखर पाटील प्रदीप पेंदापल्लीवार सिद्धू पुजारी अरुण सिडगीधी दत्तात्रय धनके श्रीमंत चौगुले घाडगे हांडे ज़ुल्फ़िकार वड्डो डॉ राजेंद्र शहा मोहसीन कोत कुंडे विष्णू सुरवसे एजाज कोटी इलियास शेख इकबाल टांगसाल इत्यादी पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते