श्री नरसिंग महाराज यात्रा महोत्सवात गाडेकर महाराजांचे राष्ट्रीय किर्तन

0
677

आकोटः प्रतिनिधीं –

आकोट शहराचे ग्रामदैवत नरसिंग महाराजांचा यात्रा महोत्सव दि.१३ नोव्हेंबर पासुन सुरु झाला आहे.यात्रा महोत्सवात भजन प्रवचन, हरीपाठ भारुड ,किर्तन गोपालकाला, दहीहंडी गुरुपुजन संपन्न झाले असुन ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या यात्रा महोत्सवात यंदा प्रथमच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी ,गुरुदेवभक्त, राष्ट्रीय किर्तनकार डॉ.उद्धवराव गाडेकर (पाटसुल) यांचे राष्ट्रीय हरीकीर्तन पार पडणार आहे.
गाडेकर महाराजांचे हे हरीकीर्तन शुक्रवार दि.२२ नोव्हेंबर रोजी रात्री ८ ते १० वा. दरम्यान पार पडणार असल्याचे नरसिंग महाराज संस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे.आकोट शहर व ग्रामीण परीसरातील नागरिकांनी या राष्ट्रीय हरीकीर्तनाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.