परळीत डासांचा सुळसुळाट; जनतेच्या आरोग्याकडे न. प. प्रशासनाचे दुर्लक्ष― प्रा. विजय मुंडे

0
446
Google search engine
Google search engine

तीन दिवसात डास निर्मूलन फवारणी न केल्यास भाजपाचा आंदोलनाचा इशारा

परळी/प्रतिनिधी

दि.२० – परळीत घाणीच्या साम्राज्याने थैमान घातले असून त्यामध्ये अनेक निष्पाप गरीब लोक वेगवेगळ्या आजाराने बळी पडत आहेत मात्र न.प. प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून सर्वच वस्त्यांमध्ये तात्काळ 3 दिवसात डास निर्मूलन फवारणी करून नाल्या दुरुस्त व स्वच्छ कराव्यात अन्यथा राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री मा. पंकजा ताई मुंडे, खा.डॉ.प्रीतमताई मुंडे आणि भाजपाचे नेते प्रा.टी. पी. मुंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी परळी च्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा भाजपाचे युवक नेते तथा मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा. विजय मुंडे यांनी दिला आहे.

परळीत घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे आले गरीब वस्त्यांमध्ये डासांची फवारणी सुद्धा केलेली नाही तर एकीकडे परळी नगरपालिका सत्कार घेण्यात गुंग आहे त्यांना गरीब माणसांच्या आरोग्याचे काही देणे घेणे नाही. परळीतील अनेक गल्लीतील व वस्तीतील नाल्या दुरुस्त व स्वच्छ केलेल्या नाहीत त्यातील घाणीमुळे डासांची निर्मिती होऊन लोक डेंग्यू , हिवताप ,सर्दी, खोकला व अशा अनेक आजारांनी त्रस्त आहेत असे असतानासुद्धा न.प. प्रशासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे आणि झोपेचे सोंग घेत आहे.

डेंग्यू सारख्या भयानक आजारांनी जनता एकीकडे त्रस्त असून न. प. प्रशासन मात्र सत्कार घेण्यामध्ये गुंग आहे न. प. प्रशासनाने सामान्य जनतेला मात्र वाऱ्यावर सोडले आहे. दवाखान्यामध्ये अशा आजारावर उपचार घेताना सामान्य नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे .दवाखाने अशा आजाराने गच्च भरलेले असून त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून 3 दिवसाच्या आत प्रशासनाने त्वरित डास निर्मूलन फवारणी करावी ,नाल्या दुरुस्त व स्वच्छ कराव्यात अन्यथा भारतीय जनता पार्टी परळी च्या वतीने नगरपालिकेवर आंदोलन करण्याचा इशारा भाजपा युवक नेते तथा परळी मार्केट कमिटीचे उपसभापती विजय मुंडे यांनी दिला आहे.