पंकजाताई मुंडेंनी केलेल्या कामाचे यश

0
704
Google search engine
Google search engine

प्रधानमंत्री आवास योजनेच्या उत्कृष्ट कामाबद्दल राज्यपालांनी केला परळीचा गौरव

प्रतिनिधी:- दिपक गित्ते

परळी- ग्रामविकास मंत्री म्हणून काम करत असताना पंकजा मुंडे यांनी ग्रामीण भागात गोर गरिबांसाठी आखलेल्या विविध कल्याणकारी योजनांचे यश दिसून येत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल परळी पंचायत समितीला पुरस्कार मिळाला असून राज्यपालांच्या हस्ते नुकतेच त्याचे वितरण झाले आहे.

पंकजा मुंडे यांनी ग्रामविकास विभागामार्फत ग्रामीण भागातील बेघरांसाठी प्रधानमंत्री आवास योजना अतिशय प्रभावीपणे राबविली. मंत्री पदाची सुत्रं हातात घेतल्यानंतर डिसेंबर २०१५ मध्येच त्यांनी योजनेचा जीआर काढला. या योजनेतंर्गत गोरगरीबांना घरकुल तर मिळालेच शिवाय ज्या लाभार्थ्यांकडे घर बांधण्यासाठी जागा नव्हती,त्यांना जागा खरेदी करण्याकरिता पंडित दीनदयाळ उपाध्याय अर्थसहाय्य योजनेतंर्गत जागा खरेदीसाठी ५० हजार रूपये अर्थसहाय्य दिले. २०२२ पर्यंत प्रत्येक बेघरांना स्वतःचे हक्काचे घर देण्याचा या योजनेमागे उद्देश होता.

२०१६-१७ मध्ये सिरसाळा येथे ७२ लाभार्थ्यांना या योजनेतून पंकजा मुंडे यांनी घरकुलांसाठी ७२ लाख रुपये इतका निधी दिला. एवढेच नव्हे तर सदर लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा नव्हती,ग्रामपंचायत मार्फत जागेसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय अर्थसहाय्य योजनेतंर्गत प्रत्येकी ५० हजाराचे अर्थसहाय्य देखील मिळवून दिले, केवळ सिरसाळाच नव्हे तर संपूर्ण जिल्हयात त्यांच्या योजनेचे यश आज दिसून येत आहे.सिरसाळा येथील कामही त्यांच्याच कार्यकाळात पुर्ण झाल्याने लाभार्थ्यांना अतिशय आनंद झाला. या उत्कृष्ट कामाबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते परळी पंचायत समितीला नुकताच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.