कवी विलास ठोसर यांना प्रल्हाद शिंदे पुरस्कार – पुणे येथे पुरस्कार वितरण

0
704
Google search engine
Google search engine

 

आकोटः- प्रतिनीधी

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणारा या वर्षाचा लोक गायक प्रल्हाद शिंदे पुरस्कार प्रसिध्द व-हाडी कवी विलास ठोसर यांना जाहिर झाला आहे.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेतर्फे पुणे व भगवान महाविर शिक्षण संस्था भोसरी यांच्या सयुंक्त विद्यमाने एकविसावे राष्ट्रीय बंधुता साहित्य सम्मेलन आणी प्रकाश पगारीया व्याख्यान मालेचे आयोजन २१ व २२ डिसेंबर ला भोसरी पुणे येथे करण्यात आले आहे. या सम्मेलनामध्ये विलास ठोसर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.ठोसर हे गेल्या २५ वर्षापासुन साहित्य क्षेत्रात कार्यरत असुन ते विविध सामाजीक संस्थांशी जुळले आहेत.