विजयेन्द्र तायडे यांची ख.वि.स.संचालकपदी निवड

0
502

आकोटः ता.प्रतिनीधी –

आकोट तालुका सह.खरेदी-विक्री समिती या संस्थेच्या रिक्त झालेल्या अनुसुचित जमाती मतदार संघ संचालक पदाचे रिक्त जागेवर सहकार गटाचे श्री विजयेन्द्र प्रल्हादराव तायडे अविरोध निवड झाली आहे.
विजयेन्द्र तायडे पोपटखेड. से.सह.सोसायटी अध्यक्ष,आदिवासी नेता, प्रल्हादभाऊ तायडे माजी पं.स.सदस्य व खवीस संचालक यांचे चिरंजीव.असून सहकार गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते.आहेत.त्यांचे निवडी बद्दल सहकार गटात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष हिदायत पटेल,जेष्ठ सहकार नेते अॕड अनिल पाचडे व नानासाहेब हिंगणकर यांना दिले आहे.
संस्थेच्या कार्यालयात नवनियुक्त संचालक विजयेन्द्र तायडे यांचा संस्थेचे अध्यक्ष हिदायत पटेल व नानासाहेब हिंगणकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष शेषराव पाटील वसु,जेष्ठ संचालक सुभाषराव मगर,अरुण डांगरे, अरुण जवंजाळ,शिवराम बुंधे,दिनकरराव गावंडे तथा अनंत गावंडे व संस्थेचे व्यवस्थापक डी.एस हिंगणकर ., सहकार गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.