हभप गणेश महाराज शेटे यांची महाक्षेत्र पंढरपूर येथे श्रीमद् भागवत कथा-चला पंढरीसी जाऊ रखुमादेवी पांडुरंगास पाहू

0
847
Google search engine
Google search engine

आकोटः प्रतिनिधी-

समस्त वारकर्‍यांचे श्रद्धास्थान महाक्षेत्र पंढरपूर येथील पांडूरंगाच्या दरबारात सलग तिसऱ्या वर्षी विश्व वारकरी सेनेच्या माध्यमातून ह भ प गणेश महाराज शेटे यांच्या सुमधुर वाणीतून संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ६ जानेवारी २०२० ते १२जानेवारी २०२० दरम्यान ही कथा पार पडणार आहे.कथे दरम्यान सकाळी ५ ते ६ काकडा भजन सकाळी ८ ते ११ श्रीमद् भागवत कथा सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ व रात्री 7 ते 9 हरिकीर्तन पार पडणार आहे यासंदर्भात दैनंदिन किर्तन सेवेत 6 जानेवारी रोजी रात्री भजन संध्या दिनांक ७ ला ह-भ-प देशमुख महाराज दिनांक ८ ह-भ-प दत्तात्रय महाराज पवार दिनांक ९ अरुण महाराज बुरघाटे दिनांक 10 ह भ प तुकाराम महाराज चावरे दिनांक 11 अरुण महाराज लांडे तर दिनांक 12 रोजी गणेश महाराज शेटे यांची कीर्तन सेवा पार पडणार आहे. पंढरपूर कथयात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी लक्झरी तथा रेल्वे प्रवासाची व्यवस्था उपलब्ध असणार आहे तसेच कथेला येणाऱ्या भाविकांच्या साठी चहा नाश्ता दोन वेळ जेवणाची उत्तम व्यवस्था आयोजकांतर्फे असणार असल्याची माहिती ह भ प गणेश महाराज शेटे यांनी दिली .पंढरपूर कथा यात्रा प्रवासात औंढा नागनाथ परळी वैजनाथ आंबेजोगाई तुळजापूर आदी दर्शनीय स्थळे असणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ९८३४६२११५९, ९०११८८२९२१ या नंबर्सवर संपर्क करता येईल.