राज्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करा, डॉ. प्रितमताई मुंडे

0
632
Google search engine
Google search engine

परळी/ प्रतिनिधी

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील सर्वच पिकांचे नुकसान झाले असून यामध्ये कापूस पिकाचा ही समावेश आहे.राज्यात केवळ विदर्भामध्ये सप्टेंबर महिन्यापासून शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु झाले असून मराठवाड्यासह राज्याच्या इतर भागात अजूनही शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु झाले नाहीत.

आज लोकसभेत मा.सभापती महोदयांच्या माध्यमातून मराठवाडा व राज्याच्या इतर भागात तातडीने शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करावेत अशी मागणी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केली.मराठवाडा व इतर भागात शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु नसल्यामुळे विक्री योग्य असलेल्या कापसाचे नुकसान होत आहे परंतु कापसाचे खरेदी भाव सुद्धा कमी होत आहेत.नैसर्गिक संकटांमुळे अडचणींचा सामना करणाऱ्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने कापूस खरेदी केंद्र सुरु करावेत अशी मागणी केली.