अखिल सेवानिवृत्त शिक्षक संघाची अकोट तालुका सभा संपन्न

196

अकोटःसंतोष विणके-

अखिल सेवानिवृत्त शिक्षक संघ आकोट तालुक्याची सभा नुकतीच स्वामी विवेकानंद हायस्कूल अकोट येथे पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब पोटे हे तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी विवेकानंद हायस्कूलचे प्राचार्य सुनिल वसू यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी सभेत संघटनेचे सरचिटणीस त्र्यंबकराव विठ्ठलराव सावरकर यांचा सपत्नीक भावपूर्ण सत्कार करण्यात आला. सर्वप्रथम अध्यक्ष व अतिथी यांच्या हस्ते सरस्वती पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले यावेळी मंचावर भाऊसाहेब पोटे श्री सुनील वसु श्री कळसकर मुर्तीजापुर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला श्री पाटील श्री देऊळकर व रावणकर यांना तालुका कार्यकारणी तर्फे हारार्पण करण्यात आले भाऊसाहेब त्र्य .वी. सावरकर व सौ. कान्होपात्रा सावरकर यांना शाल श्रीफळ कापड व साडीचोळी देऊन अकोट व तेल्हारा संघटनेतर्फे भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी श्रीमती निर्मला पिंजरकर सुरेंद्र पिंजरकर श्री कळसकर मुर्तीजापुर आर एस रावणकर व पु.ग.अस्वार यांनी तुकडोजी महाराज यांचे वचन चार्ट व श्री पद्माकर पाटील श्री पाटील. श्रीमती बाळे मॅडम यांनी भेटवस्तू शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री ह तु नांदुरकर सेवानिवृत्त केंद्रप्रमुख यांनी केले तर श्री गावंडे श्रीकृष्ण ठाकरे श्री देऊळकर श्रीमती पिंजरकर श्री गावंडे पाटील प्राध्यापक सुनील वसु यांनी समयोचित अनुभवात्‍मक भाषणे केली अध्यक्षीय भाषणातून भाऊसाहेब पोटे यांनी संघटनेच्या कार्याचा गौरव करून नवीन शिक्षकांनी पुढे येऊन संघटना टिकवुन अजून मजबूत करावी असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अंदुरकर व श्री रुमाले यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री गावंडे यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाचा कार्यभार श्री ज.शा.गावंडे यांनी केले. श्री शेंडे श्री राऊत श्री चोटीया श्री उमेश जुनगरे यांनी वाहला कार्यक्रमास अकोट व तेल्हारा तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकांनी सहभाग घेतला तसेच प्रशांत सावरकर व सौ.मींना सावरकर यांची यावेळी विशेष उपस्थिती होती चहा फराळ नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

जाहिरात