एफ एम काशेलानी इंग्लिश मिडिअम स्कूल मध्ये संविधान दिन साजरा..

0
441
Google search engine
Google search engine

शेगांव :-  एफ एम काशेलानी इंग्लिश मिडिअम स्कूल मध्ये २६ नोव्हेंबर च्या औचित्याने संविधान दिन साजरा करण्यात आला.

सोबतच २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व नागरिकांना व पोलीस कर्मचाऱ्यांना यावेळी श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक श्री रविकिरण देशमुख, उपमुख्याध्यापक श्री प्रविण ठाकरे यांनी संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद, मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. २६/११ च्या थरारक दृश्याची चित्रफीतही यावेळी दाखवण्यात आली. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बलिदानाचे वर्णन करताना “हा वसा आणि वारसा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून मिळाला तसेच कारगिल असो वा २६/११ चा दहशतवादी हल्ला महाराष्ट्र नेहमीच मातीसाठी बलिदान देण्यासाठी अग्रेसर राहलाय” असे मत रविकिरण देशमुख सरांनी व्यक्त केले. सोबतच “आज कुठलाही मुद्दा घेतला तरी त्यावर एकमत होणे जवळजवळ अशक्य असते. तरीही ७ दशकाआधी २९ राज्याच्या ९३ संस्थांचे आणि ४ कमिश्नरांच्या प्रांतांचे ३८९ सदस्य एकत्र येऊन घटनेवर सह्या करतात आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाची सर्वात मोठी लिखित घटना अस्तित्वात येते हा एक चमत्कारच मानायला हवा” असे मत शुभम देशमुख यांनी व्यक्त केले. यानंतर सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मा. मुख्याधापक श्री रविकिरण देशमुख सरांच्या सोबत संविधान सभेच्या उद्देशपत्रिकेचे वाचन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रियंका देशमुख यांनी केले.