चांदुर बाजार तालुक्यात अवैध धंदे जोमात सुरू शहरातून ग्रामीण भागात देशी दारू ची वाहतूक,विना नंबर वाहनवरून होते वाहतूक

0
753
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार तालुक्यात अवैध धंदे जोमात सुरू
शहरातून ग्रामीण भागात देशी दारू ची वाहतूक,अवैध दारू करणारे याना राजकीय पक्षचा पाठींबा

चांदुर बाजार तालुक्यात मोठय़ा प्रमाणात अवैध धंदे सुरू असून यातून लाखो रुपयाची उलाढाल होत असताना चांदुर बाजार,शिरजगाव कसाबा, आसेगाव,ब्राम्हणवाडा थडी पोलिसांचे पूर्णत: दुर्लक्ष आहे.

पोलिस विभाग अवैध धंदेवाल्यांना पाठबळ देत असल्याने अवैध व्यवसाय करणार्‍याचे मनोबल वाढले आहेत. गावागावात अवैध व्यवसायीकांची दहशत निर्माण झाली आहे. सामान्य नागरिकांचे जगणे कठिण झाले आहे. येथील पोलिस स्टेशनमध्ये दुसर्‍या तालुक्यातील गावांचाही समावेश आहे. प्रत्येक गावात मोहफूलाची दारू गाळप करून विक्री केल्या जात आहे. तसेच अवैध वाळू व्यवसाय मोठय़ा प्रमाणात सूरू असून टिप्पर, ट्रॅक्टर व ठिय्या मालक एन्ट्रीच्या नावाखाली पोलिसाना देण देत असतात.

सध्या गावागावात लग्न उत्सवाची धूम असल्याने पाहुण्यांसाठी मोहफूल दारू विक्रेते देशी, विदेशी दारू ठेवून अवैध विक्री करीत आहेत. कमी पैशात हौस पूर्ण होत असल्याने अनेक तरुण दारूच्या व्यसनाकडे वळले आहेत. या व्यसनातून काही तरुण अविवाहितच मृत्यू पावले, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. मद्यपी सकाळपासूनच दारू ढोसून चौकात ओरडत असल्याने महिलांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. सट्टा व्यवसाय जोमात सूरू असून अनेक तरुण या धंद्याकडे वळले आहेत. सट्टय़ाच्या नादात अनेकांची शेती, घरे अवैध सावकाराकडून बळकावल्या गेली.

ग्रामिण भागात तास पत्त्यांचा जुगार(काटपत्ती) तसेच कोंबडा बाजार सुरू असून या जुगारात लाखो रुपयांची उलाढाल होत असते. यामध्ये जुगार भरविणार्‍याला पोलिसांना हफ्ता द्यावा लागत असल्याने तो जुगार खेळणार्‍या व्यक्तींकडून दहा टक्के कमिशन कापतो. अशी माहिती जुगार खेळनारेच सांगतात. जुगाराच्या ठिकाणी अवैध सावकार उपस्थित असतात. ते पैसे हरणार्‍या व्यक्तीला दहा टक्के व्याजाने पैसे देतात, एक महिन्याचे व्याज अगोदरच कापतात. दोन दिवसात पैसे परत न केल्यास व्याजा व्यतिरिक्त दररोजचा पाचशे रुपये दंड आकारला जातो. या प्रकारामुळे जुगार खेळणार्‍यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.

जिल्ह्याच्या ठिकाणावरून येऊन स्थानिक गुन्हे शाखा विभाग या अवैध व्यवसायीकांवर कारवाई करतात. मग हे व्यवसाय स्थानिक पोलिसांना माहीत नाही का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.