मुंडगावात संविधान दिवस उत्साहात साजरा

0
721
Google search engine
Google search engine

अकोटः ता .प्रतिनिधी

मुंडगाव येथे त्रिमुर्ती बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने दि.२६रोजी सायंकाळीा ७ वाजता भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी काशिरामजी साबळे मुंडगाव ग्रामपंचायतचे सरपंच श्रावण भरक्षे यांचे हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमे समोर द्विप प्रज्वलित करुन पुष्प हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख त्रिमुर्ती बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष शेषराव सरकटे उपाध्यक्ष मनिष सरकटे, सचिन सरकटे, रंजित सरकटे बंटी सरकटे, अंकुश सरकटे, विकि वानखडे, अनिल सरकटे विकास सरकटे, बोदानंद आराख,सुधीर पळसपगार, स्वप्निल सरकटे गावातील प्रतिष्ठित नागरिक यांची उपस्थिती होते यावेळी सुत्र संचालन वानखडे सर यांनी केले.