चांदुर बाजार शहरात अवैध दारू मोटरसायकल विक्री करणाऱ्या चा धुमाकूळ

0
667

चांदुर बाजार शहरात अवैध दारू मोटरसायकल विक्री करणाऱ्या चा धुमाकूळ,

चांदुर बाजार

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सर्व नियम वेशीला टांगुन अतिक्रमित झुडपी जंगल जागेवर देशी दारू विक्रीचे दुकान सर्रास सुरू आहे. पहाटेपासून तर मध्यरात्रीपर्यंत मद्यविक्रीचा धंदा सुरू असून याकडे उत्पादन शुल्क विभागाने पाठ फिरवित मुकसंमती दिल्याचे समजते. त्यामुळे तात्काळ कारवाई करण्याची मागणी आहे.

तालुक्यातील येथील मुख्य बाजार पेठ येथील अनेक ठिकाणी वरून अवैध दारू ची विक्री सुरू आहे यात अवैध दारू विक्री करणारे काही जण हे पोलीस विभागाच्या संपर्क असल्याने पोलीस त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करीत आहे.त्यामुळे शहरातून ग्रामीण भागात या ठिकाणी विक्री जोरात सुरू आहे.

ग्रामीण भागात अवैध दारूची विक्री करण्यासाठी कुरण झुडपी जंगल व गवत याकरिता समाविष्ट करण्यात आलेला आहे. अवैध दारूविक्रीचे चालते फिरते दुकान तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात आहे.
जिल्हा उत्पादन शुल्क विभागाला याची माहिती असून देखील त्यांच्या चुप्पी मुळे मोठ्या अवैध दारू विक्री करणारे यांची संख्या वाढले तर स्थानिक पोलीस देखील यावर प्रतिबंध क कार्यवाही करीत नाही आहे. रोज तालुक्यतून पेट्या दारु विक्रीची मोटरसायकल तसेच कार मधून केली जात आहे. रोजच 50ते 100दारूच्या पेट्यांची विक्री होत असताना उत्पादन शुल्क विभाग निद्रावस्थेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे.