व्यवसाय आणि कॅटरिग साठी घरगुती सिलेंडर चा वापर,पुरवठा विभागाचे दुर्लक्ष चहाच्या टपरीवर घरगुती सिलेंडर चा अधिक वापर शशिकांत निचत

0
530

व्यवसाय आणि कॅटरिग साठी घरगुती सिलेंडर चा वापर,पुरवठा विभागाचे दुर्लक्ष
चहाच्या टपरीवर घरगुती सिलेंडर चा अधिक वापर

शशिकांत निचत

सध्या जो तो आपला व्यवसाय करणाऱ्या कडे कल देत आहे यात घरगुती सिलेंडर चा वापर होत असताना चे चित्र चांदुर बाजार तालुक्यातील तसेच ग्रामीण भागातील अनेक हॉटेल तसेच चहाच्या टपरीवर दिसत आहे.यामध्ये अधिक जास्त पैसे देऊन घरगुती सिलेंडर विकत घेतले जाते मात्र चांदुर बाजार येथील पुरवठा विभाग मधील अनेक कर्मचारी अश्या व्यवसायिक वर कार्यवाही करण्या ऐवजी त्यांच्या कडून वरिष्ठ अधिकारी यांच्या नावा वर वसुली करत आहे.

चांदुर बाजार तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात चहाची टपरी,अल्पहार साठी घरगुती सिलेंडर चा वापर करत आहे. तर आपल्या कार्यवाही होऊ नये म्हणून काही नास्था च्या गाडीवर घरगुती सिलेंडर हे पोत्यात भरून आपला व्यवसाय वाढवीत आहे.यावर कोणाचे लक्ष नसल्याने या व्यवसायला चांगलीच वृद्धी मिळत आहे. त्यामुळे आता यावर कार्यवाही कोण करणार अशी चर्चा आता चांगलीच रंगू लागली आहे.

चांदुर बाजार तालुक्यातील अनेक ग्रामीण तसेच शहरात घरगुती सिलेंडर सहज उपलब्ध होत असल्याने अनेक जण याला पसंती देत आहे तर गॅस वितरण कंपनी सुद्धा त्यांना व्यवसाहिक सिलेंडर पेक्षा घरगुती सिलेंडर चा पुरवठा करून देत आहे.तर या मुळे ज्याचा सिलेंडर आहे ते काही तरी काळा बाजार करून त्याची विक्री चांदुर बाजार तालुक्यात सुरू असल्याचे बोलले जात आहे .या सर्व प्रकरणाची माहिती असून देखील पुरवठा विभाग मधील कर्मचारी हे सकाळी आणि रात्री पेट्रोलीग करून आपला व्यवसाय मात्र वरिष्ठ अधिकारी यांच्या नावाचा फायदा घेत तेजीत करीत आहे.

आता वरिष्ठ अधिकारी या कडे लक्ष देऊन कार्यवाही करावी अशी जनसामान्य व्यक्ती ची मागणी आता तालुक्यातून तसेच ग्रामीण भागातून जोर धरत आहे..