कर्मचार्‍यांचे अप-डाऊन थांबणार तरी कधी?८0 टक्के पेक्षा अधिक कर्मचारी घेतात लाभ नोव्हेंबर च्या ग्रामसभेत घेतला जाणार मुख्यलयीन राहण्याबाबत ठराव

0
912
Google search engine
Google search engine

कर्मचार्‍यांचे अप-डाऊन थांबणार तरी कधी?८0 टक्के पेक्षा अधिक कर्मचारी घेतात लाभ
नोव्हेंबर च्या ग्रामसभेत घेतला जाणार मुख्यलयीन राहण्याबाबत ठराव

शशिकांत निचत:-

प्रशासनाने कर्मचार्‍यांना १५ टक्के प्रोत्साहन भत्ता व सर एक तर पदोन्नती लागू केली असून, त्याचा लाभ घेणारे अंशी टक्के कर्मचारी आहेत. तरी ही ग्रामीण भागातील जनतेला आपल्या विविध कामाकरिता मानसिक आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक महसूल विभाग, पंचायत समिती ,सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनी कार्यालय, पशुवैद्यकीय दवाखाना, ग्रामीण रुग्णालय, कृषी विभाग, भुमिअभिलेख, ग्रामपंचायत तलाठी कार्यालय, कर्मचारी मुख्यालयी राहत नसून त्यांचे अप-डाऊन सुरूच आहे.मुख्यालयी कर्तव्य न पाडणार्‍या कर्मचार्‍यावर कार्यवाही करावी अशी मागणी अनेक वेळा झाली मात्र शासनाने काढलेली मुख्यलयीन निर्णय ची अंमलबजावणी सुरू झाली असून चांदुर बाजार तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत ना याबत नोव्हेंबर महिन्यातील ग्रामसभेत ठराव घेण्याचे सांगण्यात आले आहे.

मात्र शासनाने नेमणूक केलेल्या ठिकाणी मुख्यालयी राहून कर्तव्य बजावणार्‍या अधिकारी कर्मचार्‍यांची चौकशी करून संबंधितावर कारवाई करून तसेच प्रोत्साहन भत्तासुद्धा बंद करा, अशी मागणी तालुक्यातून जोर धरत आहे. शासनाने शासकीय व निमशासकीय कर्मचार्‍यांनी मुख्यालयी राहून कर्तव्य बजवावे, असा आदेश काढला आहे.

या आदेशाची चांदुर बाजार तालुक्यात सर्रास पायमल्ली होताना दिसून येत आहे. यामध्ये शिक्षक-शिक्षिका, आरोग्य विभागाचे कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आदींचा समावेश आहे. कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने जनतेची अनेक कामे खोळंबली जात असतात.आपण तक्रार केली तर आपले काम संबंधित अधिकारी करणार नाही या भीतीने नागरिक स्वतःला आर्थिक तसेकंग मानसिक त्रास सहन करून घेताना अनेक वेळा दिसून आले.

गावाचा विकास, विविध कामकाज व आरोग्य विषयक सुविधा गाव खेड्यात तांडा वस्तीत मिळाली, तर जनतेची वेळ व आर्थिक बचत होते. शासन व गाव यांच्यातील मुख्य दुवा ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी, डॉक्टर, कृषी विभागाचे कर्मचारी आहेत. त्यामुळे सदर कर्मचारी अधिकारी मुख्यालयी राहणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने त्यांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच मुख्यालयी राहण्याची भत्तासुद्धा दिला जातो. परंतु, त्या आदेशाला न जुमानता मुख्यालयी राहण्याचे कर्तव्य समजवुन न घेता आपल्या र्मजीप्रमाने शासकीय कर्मचारी वागत आहेत. तालुक्यात अनेक गावात तलाठी कार्यालयाची इमारती आहेत. मात्र, तलाठी तहसील कार्यालयात बसून आपले काम करतात. नागरिक त्यांच्या शोध घेण्यासाठी 10 ते २0 किमीचा अंतर पार करून तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करतात.
तालुक्यातील सर्वच विभागातील बहुतांश कर्मचारी जिल्हा ठिकाण अमरावती,परतवाडा, अचलपुर, अकोला येथून अपडाऊन करीत आहेत. परिणाम, या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी म्हणत कर्मचारी शुक्रवारीच गावी निघून जातात. त्यामुळे तालुक्यासह शहरातील कार्यालय सुखात दिसून येत आहे.

नोव्हेंबर च्या ग्रामसभेत ठराव घेण्याचे निर्देश………..
ग्राम पातळीवर काम करणाऱ्या तलाठी,ग्रामसेवक,शिक्षक,वायरमन, आरोग्य सेवक यांनी मुख्यलयीन राहण्याबाबत चा ग्राम सभेचा ठराव घेणे आवश्यक आहे.तर यामुळे सरपंच धनबल्याड अश्या व्यक्तींना य हाताशी घेऊन कर्मचारी यांच्या वर रोख आता ग्रामसभेच्या ठराव लागणार हे मात्र तितकेच खरे.

प्रतिक्रिया:-
शासनाच्या निर्णय वरून तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायती यांच्या कडून येत्या नोव्हेंबर च्या ग्रामसभेत याबाबत ठराव मागितले आहे.अध्यपही एकही ठराव प्राप्त झाला नाही.
ड्रॉ. प्रफुल्ल बोरखडे गटविकास अधिकारी पंचायत समिती चांदुर बाजार