आकोटात शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याचा जल्लोष

0
630
Google search engine
Google search engine

आकोट ः- प्रतीनीधी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मा.श्री उध्दव ठाकरे यांच्या शिवतिर्थावरील ऐतिहासिक शपथविधी सोहळा पार पडत असतांना शिवसेना ,राष्ट्रवादी ,काॕग्रेस आघाडीच्या कार्यकत्यांनी संयुक्तपणे जल्लोष करीत आनंद व्यक्त केला.

स्थानिक शिवाजी महाराज चौकात शिवसेना,राष्ट्रवादी ,काॕग्रेस च्या महाराष्ट्र विकास आघाडीचे शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येवून “ठाकरे सरकार” चे जल्लोषात स्वागत केले.

माजी आमदार संजय गावंडे,राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते नानासाहेब हिंगणकर ,काॕग्रेस नेते प्रा.संजय बोडखे,शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख दिलिप बोचे, राष्ट्रवादी काॕग्रेस चे तालुकाध्यक्ष कैलास गोंडचवर,शहराध्यक्ष प्रा.नवनीत लखोटीया,काॕगेसचे शहराध्यक्ष सारंग मालाणी,शिवसेना तालुका प्रमुख शाम गावंडे,सह शेकडो तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

हीच ती वेळआहे. उध्दवजींच्या राज्याभिषेकाने शिवरायांच्या महाराष्ट्रात नव्या युगाचा प्रारंभ झाला आहे.अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादीचे नेते नानासाहेब हिंगणकर यांनी व्यक्त करुन नव्या सरकारचे स्वागत केले.शिवसैनिकांसाठी हा ऐतिहासिक व आनंदाचा क्षण आहे. शेतक-यांना न्याय देणारं आपलं सरकार आले आहे.अशा शब्दात माजी आमदार संजय गावंडे यांनी व्यक्त केला.महाराष्ट्रात ख-या अर्थाने सोनियाचे दिवस येतील.हे विकासाचे पर्व ठरेल असा विश्वास काॕग्रेसचे प्रा.संजय बोडखे यांनी व्यक्त केला.

कार्यकर्त्यांनी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अमर रहे.महाराष्ट्राचे चाणक्य शरदश्चंद्रजी पवार,सोनिया गांधी उध्दव ठाकरे जिंदाबाद,महाराष्ट्र विकास आघाडीचा विजय असो अशा घोषणा देत आनंद साजरा केला.
आनंदोत्सवात दयाराम पाटील,देवानंद मर्दाने,बंडू कुलट,मनोज खंडारे,गजेंद्र पाचडे,मुकुंद पांडे,प्रमोद लहाने,मतीनमभाई,अफजल खां,नागेश आग्रे,हरिभाऊ दहीभात,जावेद पटेल मोहालेवाले,घनश्याम बीजणे,राहुल हिंगणकर आदीसह शिवसेना,राष्ट्रवादी ,काॕग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करुन,मिठाई वाटून आनंद साजरा केला.