मध्यस्थी मेळावा समाजाचा वेळ व पैसा वाचविणारा- शेतकरी नेते प्रकाश पोहरे ◆ आळंदी, पुणे येथे मध्यस्थी मंडळाचा मेळावा संपन्न

0
1650
Google search engine
Google search engine

अकोटः प्रतीनिधी

श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था अकोट अंतर्गत मध्यस्थी वधू वर सूचक मंडळ पुणे शाखेच्या वतीने आळंदी, पुणे येथे विदर्भ मराठा समाजाचा राज्यस्तरीय उपवर युवक युवती परिचय व पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला.
“आज मुलींकडे चूल आणि मूल या परिघाबाहेर पाहण्याची आवश्यकता आहे. मुली सक्षम होत आहेत, नोकरी व्यवसाय करत आहेत मुला, मुलींना सोयरीक बघायला वेळ नाही. त्यामुळे पुण्यासारख्या ठिकाणी सर्वांना एकत्र आणून समाजाचा वेळ,पैसा वाचविणारा मध्यस्थी वधू वर परिचय मेळावा हि काळाची गरज आहे.” असे प्रतिपादन शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प सुदाम शास्त्री तायडे महाराज होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी नेते तसेच दै. देशोन्नती चे मुख्य संपादक प्रकाश पोहरे, लेफ्टनंट कॅप्टन सुनिल डोबाळे,माजी नगरसेवक सुरेश नढे पाटील, पिंपरी चिंचवड मनपा वृक्ष प्राधिकरण समिती चे सदस्य संभाजी बारणे, नयनाताई मनतकार, शोभाताई म्हैसने, महादेवराव सावरकर, सुरेशराव कराळे उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात ह.भ. प. सुदाम शास्त्री तायडे महाराज यांनी “लग्नामध्ये पूर्वीपासून मध्यस्थी ची भूमिका अतिशय महत्त्वाची मानली जाते. तोच वसा मध्यस्थी मंडळ पुढे नेत आहे. याचा विशेष आनंद आहे” असे मनोगत व्यक्त केले.
श्री संत गजानन महाराज व वासुदेव महाराज यांच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. उपवर युवक युवती यांनी परिचय पत्राचे वाचन केले. मधल्या वेळात मान्यवरांची मनोगते झाली. भोजनानंतर सोयरीक बैठक पार पडली. ज्यामध्ये परिचय पत्रांची देवाणघेवाण झाली. पुणे,मुंबई,नाशिक, ठाणे येथील समाजबांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतला. शोभाताई म्हैसने यांनी प्रास्ताविक केले, नीलेश म्हसाये यांनी सुत्रसंचालन केले, वैभव टेकाडे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिरुद्ध काळे, दिपक धुमाळे, संतोष माळी,मोहन डोंगरे,अभय तारक, रामदेव शेळके, अमित मोडक यांनी परिश्रम घेतले.