अमरावती येथे आरोग्य विभागातर्फे जनजागरण रॅली

0
641
Google search engine
Google search engine

 

अमरावती-: जागतिक एड्स दिन सप्ताहानिमित्त आरोग्य विभागातर्फे जनजागरण रॅली आज काढण्यात आली.
विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवून जिल्हा रुग्णालय येथून रॅलीचा शुभारंभ झाला. महापालिका आयुक्त संजय निपाणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रमणले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे आदी उपस्थित होते.
जिल्हा रुग्णालय ते राजकमल चौक असा मार्ग असलेल्या या रॅलीत विविध शाळा- महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रातील नागरिकांनी सहभाग घेतला. जागृती व सुरक्षा पालनाची शपथ यावेळी घेण्यात आली.
यावेळी विद्याभारती फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याचे सादरीकरण केले. एड्स बाबत जागृती संदेश देणारी मानवी साखळी ही यावेळी उभारण्यात आली.