श्री गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालयाचे वतीने शहरातून दिव्यांग दिंडींचे आयोजन

0
1954
Google search engine
Google search engine

शेगांव :- 3 डिसेंबर हा दिवस संपूर्ण जगामध्ये दिव्यांग दिवस म्हणून साजरा होतो 2006 मध्ये भारत सरकार कडून दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या प्रवाहात. आणण्याकरिता सुरुवात झाली होती, त्यानंतर भारतामध्ये 3 डिसेंबर हा दिवस दिव्यांग दिन म्हणून साजरा व्हायला सुरुवात झाली.

आज 3 डिसेंबर असल्यामुळे शेगावातील मतिमंद विद्यालय आणि सामाजिक संस्थांनी मिळून तसेच शहरातील दानशूर व्यक्तींनी एकत्र येऊन दिव्यांग दिंडीचे आयोजन केले होते, या दिंडीमध्ये दिव्यांग हे कोठेही कमी नाहीत हे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला, तर त्यांनी सुद्धा या उपक्रमाला संपूर्ण प्रतिसाद दिला, या दिंडीमध्ये दिव्यागांनी तबला वादन, योग शिक्षण लेझीम चे व संत नगरी असल्यामुळे गजानन महाराजांना वंदन म्हणून एका दिव्यांग विद्यार्थ्याला खुर्चीवर बसून आजूबाजूला वारकऱ्यांनी नृत्य करत धार्मिक संदेश दिला आणी दिव्यांग कोठेही कमी नाही,हे दाखवुन दिले अतिशय चांगल्या प्रकारे या दिंडीचे आयोजन करून दिव्यांग विद्यार्थ्यांनी आणि इतर सामाजिक संस्थांनी संपूर्ण गावातील जनतेचे मन जिंकले मुरारका महाविद्याल ते गजानन महाराज मंदिरा पर्यंत ही दिंडी निघाली होती, गजानन महाराज मंदिरात या दिंडीचे समापन झाले.