*प्रहारच्या वतीने दर्यापुर येथील बिडीओ दालनात शिदोरी आंदोलन – कामे न केल्यास अधिकाऱ्यांचा खुर्चीचा लीलाव करु*

0
1208

प्रतिनिधी /
दर्यापुर तालुक्यातील येवदा येथील विविध नागरी समस्यांचा निपटारा करण्यासाठी आज दि 3/12/2019 रोजी दुपारी 12 वाजता दर्यापुर पंचायत समितीचे बिडीओ नंदलाल धारगे यांच्या दालनात प्रहारचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रदिप वडतकर सह असंख्य कार्यकत्यासह ठीय्या मांडून शिदोरी खाऊन आंदोलन करण्यात आले.
येवदा येथील जनतेच्या विविध समस्या सोडविण्यासाठी पंचायत समिती, ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा कोणत्याही प्रकारचे प्रतिउत्तर गेल्या दोन वर्षांपासून न मिळाल्याने प्रशासनाच्या विरोधात प्रहार संघटनेच्यावतीने दर्यापुर येथील बिडीओ यांच्या दालनात चर्चा सुरु असतांना कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर विस्तार अधिकारी अनुप कुलकर्णी, तसेच सध्याचे नविन आलेले ग्रामविकास अधिकारी निरंजन गायगोले यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने प्रहार पक्षाचे आंदोलन तिव्र होत गेले
भारत मातेच्या जयघोषाने पंचायत समिती परिसर दणाणुन सोडला होता. त्यानंतर गटविकास अधिकारी कार्यालयात चर्चाअंती संबंधित विस्तार अधिकार अनुप कुलकर्णी यांनी कार्यकर्त्यांचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यामुळे ताण तणाव निर्माण झाला होता पंचायत समिती कार्यालयात पोलीस प्रशासनाच्या वतीने बंदोबस्त असताना सुद्धा दर्यापुर विधानसभा प्रमुख प्रदीप चौधरी यांनी विस्तार अधिकारी अनुप कुलकर्णी यांची खुर्ची बाहेर काढून प्रशासनाचा निषेध केला. तसेच येवदा ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार पक्षाच्या वतीने देण्यात आला तसेच विलास कैसर यांनी ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा करण्यात केली. प्रहार संघटनेच्या घोषणाबाजीमुळे परिसरात संन्नाटामय वातावरण झाले होते. बिडीओ यांच्या लिखित आश्वासनानंतर अखेर प्रहार पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रदिप वडतकर यांनी आंदोलन थांबवले आंदोलन स्थळी प्रहारचे जिल्हा संपर्क प्रमुख
प्रदीप वडतकर सह महेश कुरळकर डॉ दिनेश म्हाला प्रदिप चौधरी प्रदिप निमकाळे आकाश घाटाळे अनुराग मानकर उमेश बुरे विलास कैसर गणेश लाखे सतिष खेडकर संदिप चोरे पप्पू पाटील नकूल सोनटक्के उमेश काळे निवृत्ती गळसकर रामकृष्ण टाले मंगेश सावळे मंगेश शेळके व असंख्य कार्यकत्यांची उपस्थिती होती….