शिक्षक आणि आई वडिलांनी दिलेले संस्कार मुलांचे भविष्य घडवतात-: पंचायत समिती सभापती सौ.मंदाताई करांडे

0
1299
Google search engine
Google search engine

सांगली/कडेगाव :-

शिक्षक आणि आई वडिलांनी दिलेले संस्कार मुलांना घडवतात आणि यातूनच पुढील भावी पिढी घडत असते तेच पुढे देशाचे आधारस्तंभ बनत असतात असे प्रतिपादन कडेगाव पंचायतीच्या सभापती सौ मंदाताई करांडे यांनी व्यक्त केले.
त्या तोंडोली(ता.कडेगाव) येथे ४५ व्या विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
यावेळी जिल्हा परीषदेच्या सदस्या सौ रेश्माताई साळुंखे, शांताताई कनूंजे,गटविकास आधिकारी दाजी दाईंगडे,तालूका पंचायत सदस्य आशिष घार्गे,रविंद्र ठोंबरे, यांनी मनोगत व्यक्त केले. सौ.करांडे यांचे हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या मध्ये ६ वी ते ८वी साठी प्रथम क्रमांक यशवंत हायस्कुल देवराष्ट्रे,व्दितीय क्रमांक महात्मा गांधी विद्यालय कडेगाव, तर तृतीय क्रमांक श्री अंबिका विद्यामंदिर तोंडोली च्या विध्यार्थींनी पटकावला तर ९ वी ते १२ वी साठी प्रथम क्रमांक शिवाजी हायस्कुल चिंचणी, द्वितीय क्रमांक महात्मा गांधी विद्यालय कडेगाव व तृतीय क्रमांक श्रीपतराव तात्या कदम प्रशाला अंबक यांना अनुक्रमे देण्यात आले. प्रश्नमंजुषा स्पर्धेत यशवंतराव हायस्कुल देवराष्ट्रे प्रथम क्रमांक, शेळकबाव हायस्कूल शेळकबाव द्वितीय क्रमांक मिळविला.
यावेळी गटशिक्षण अधिकारी विकास राजे,सरपंच सौ.अनिता महापुरे,उपसरपंच सर्जेराव मोहिते, तोंडोली केंद्राचे केंद्रप्रमुख लक्ष्मण महापुरे, शाळेचे प्रभारी मुख्याध्यपक ए.डी. मोहिते,जेष्ठनेते शंकरनाना मोहिते-पाटिल,तंटामुक्तीचे अध्यक्ष भगतसिंग मोहिते, युवा नेते सुनिल मोहिते, शिवाजी मोहिते, अजित मोहिते, पांडूरंग मोहिते, मिलींद मोहिते, कडेगांव तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख व परीसरातील शिक्षक व शिक्षेकेतर स्टाफ,विध्यार्थी-विध्यार्थींनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.