अकोट शहरात कँडल मार्च द्वारे महामानवाला अभिवादन

0
551
Google search engine
Google search engine

अकोट प्रतिनिधी :

परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्ताने आज शहराचा मध्यवर्ती भागातुन कँडल मार्च चे आयोजन बौद्ध अनुयायी तर्फे करण्यात आले होते.
यावेळी खानापूर वेस येथून निघालेला हा कँडल मार्च कालंका चौक, शोकत अली चौक, सोनू चौक, शिवाजी चौक मार्गे अकोट रेल्वे स्टेशन येथे विसर्जन करण्यात आले , यावेळी शहरातील विविध भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते, यामध्ये महिलांची उपस्थिती प्रामुख्याने होती, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने बौध्द अनुयायी मार्गक्रमण करत होते, कँडल मार्च मधील चिमुकल्याची शिस्त वाखण्याजोगी होती,
समारोप ठिकाणी प्रमुख पाहुण्यांची भाषणे होऊन बौद्ध वंदना घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
यावेळी शहर पोलीस दलातर्फे PSI रंजितसिंग ठाकूर ,PSI सोळंके यांनी महामानवांना आदरांजली वाहिली,
कार्यक्रमाचे आयोजन मुरलीधर तेलगोटे आणि मित्र परिवार तर्फे करण्यात आले होते,कँडल मार्च मध्ये पोलीस दलातर्फे तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता,