अकोट येथे शेतकरी संघटनेचे 12 डिसेंबरला धरणे आंदोलन – मागण्या मान्य न झाल्यास 22 डिसेंबरला रास्तारोको

0
1110
Google search engine
Google search engine

अकोट/प्रतीनिधी :

शेतकरी संघटनेची कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात बैठक पार पडली.या बैठकीत अकोट व तेल्हारा तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.बैठकीची सुरवातिला देऊळगाव येथील प्रकाश पाटील गावंडे यांना श्रद्धांजली देण्यात आली.12 डिसेंबर ला शरद जोशी यांची पुण्यतिथी आहे या ला अनुसरून शरद जोशी यांचा जीवनातील बहुतांशी काळ हा शेतकऱ्यां वरील बंधन मोडण्याकरिता जीवनातील काळ खर्चिक झाला. म्हणून शेतकऱ्यांच्या जीवनात बदल व्हावा त्यांना सुखासन्माने जगता यावे या करिता शेतकऱ्यांच्या व शेती वरील बंधन मुक्त करण्यात यावी या करिता धरणे आंदोलन राज्यव्यापी करण्यात येणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास शेतकरी संघटना राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन करणार आहे.
शेतकऱ्यांना बाजारपेठ आणि तंत्रज्ञान चे स्वतंत्र देण्यात यावे.

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज मुक्ती देण्यात यावी.असलेले कर्ज रद्द करून नवीन कर्ज शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात यावे.

कर्ज मुक्ती चे आश्वासन निवडणुकीपूर्व सर्व पक्षांनी केले होते. सत्तेत आलेल्या पक्षाने सरकार स्थापन केलेली आहे तरी लवकरच या दिशेने पावले उचलून शेतकऱ्यांना कर्ज मुक्ती देण्यात यावी.
या बैठकीत जिल्हाध्यक्ष सुरेश जोगडे यांच्या हस्ते दोन्ही तालुक्यातीक पदा संबंधित फेरबदल करण्यात आले.तेल्हारा तालुका अध्यक्ष पदी निलेश नेमाडे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदी संतोष तायडे याची निवड करण्यात आली. शेतकरी संघटना युवा आघाडी पदी दिनेश देऊळकार ,अकोट तालुका युवा आघाडी पदी भूषण मेंढे यांची सर्व संमतीने निवड करण्यात आली. या बैठकीला नवीन नियुक्ती झालेल्या पदाधिकारी यांना शेतकरी संघटना माजी तालुका प्रमुख यांच्या समेत शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते ललित दादा बाहाळे व माजी जिल्हा प्रमुख सतीश बाबा देशमुख यांनी मार्गदर्शन केले.या सभेला अमोल मसुरकर, संजय ढोकने,मोहन खिरोडकार, गोपाल निमकर्डे, दिनेश गिर्हे, सुरेश सोनोने, मधुसूदन लोखंडे, चंद्रकांत वालसिंगे, शिरू पांडव,विनोद मोहकार, गजानन मोहकार, महेंद्र गीते, राजेंद्र उकळकर, अजीम खान, दानिश खान,व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.