‘एक्साईज’तर्फे जप्त 22 टन काळ्या गुळाचा लिलाव

0
980

 

अमरावती– वरूडच्या सीमा तपासणी नाका येथील राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक कार्यालयाने दारूबंदी कायद्यान्वये एका कारवाईत 22 टन 605 किलो काळा गुळ जप्त केला. आता न्यायालयाच्या आदेशानुसार त्याचा लिलाव जाहीर करण्यात आला आहे.

हा काळा गूळ अबकारी विभागाच्या एम- 1 व एम- 2 परवानाधारकांनाच खरेदी करता येईल. हा लिलाव दि. 18 डिसेंबरला सकाळी 11 वाजता वरुड (रवाळा) स्थित सीमा तपासणी नाक्यालगत उत्पादन शुल्क कार्यालयात होईल.