बाबू जगजीवन राम शैक्षणिक संकुलात महापरिनिर्वाण दिन संपन्न.

0
684
Google search engine
Google search engine

अकोट- शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते असे उद्गार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपल्या प्रास्ताविक भाषणातून प्राचार्य देवेंद्र जपसरे यांनी काढले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबू जगजीवन राम शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष डॉ. कैलास जपसरे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले महाराष्ट्र पोलीस राजेंद्र तेलगोटे यांनी बाबासाहेबांच्या जीवन चरित्रावर एक गीत सादर करून बाबासाहेबांच्या कार्याचा संदेश विद्यार्थ्यांना दिला.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्रिटिशांच्या देशात जाऊन, ब्रिटिश सरकारला, ब्रिटिश हे भारताचे आर्थिक शोषण कसे करीत आहेत हे “द प्रॉब्लेम ऑफ रुपीज” या शोधनिबंधातून सिद्ध करून दाखविले आणि ब्रिटीशांच्या देशात जाऊन ब्रिटिश राज्यकारभाराचे वाभाडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काढले, असे विचार प्रा. प्रवीण बोंद्रे यांनी आपल्या भाषणातून मांडले.
प्रज्ञा, शील, करुणा हे गुण अंगी येण्याकरिता शिक्षणाचे महत्त्व तसेच शाळेत केवळ बाराखडी शिकवू नये, तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तापूर्ण बनवावी, हे बाबासाहेबांचे विचार प्रा. नंदकिशोर झामरे यांनी व्यक्त केले. तसेच पुढे बोलताना प्रा. झामरे म्हणाले की शाळा म्हणजे उत्तम नागरिक कर्तव्यदक्ष नागरिक बनविण्याचे कारखाने आहेत.
प्रा. दीपिका पिंप्राळे यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गुणगौरव केला. तसेच प्रा. प्रवीण उगले यांनी बाबासाहेबांवर आपले विचार प्रकट केले.
अकोट शहर पोलीस स्टेशन व समाजसेवी ग्रुप संविधान जागर समिती अकोट यांच्यातर्फे “शालेय साहित्य वाटप व एक वही एक पेन उपक्रम” राबविण्यात आला. हा कार्यक्रम प्रमुख पाहुणे समाजसेविका पर्वतकारताई यांच्या उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन कु. कोमल रायबोले व कु. गायत्री ठाकरे या विद्यार्थिनींनी तर आभार प्रदर्शन कु. नंदिनी पऊल हिने केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. श्रीकांत मोहोकार प्रा. अक्षय काळे प्रा. प्रणाली श्यामस्कर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नीता कुरील, प्रदीप शेळके, प्रवीण साबळे, दिनेश इंगळे, पवन काळे, सागर अहिर, कल्पना गटकळ, मनीषा सूर्यवंशी, संधिस्टी वोवेकर, गोकुळा मोरोदे, शारदा तेलगोटे, विकी मंडले, इमरान शेख यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.