चांदुर बाजार येथे आवास दिन व लाभार्थी मेळाव्याचे आयोजन आमदार बच्चू कडू यांची विषेश उपस्थिती चांदुर बाजार

0
1334
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार येथे आवास दिन व लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
आमदार बच्चू कडू यांची विषेश उपस्थिती

चांदुर बाजार

दि 7 डिसेंबर 2019 ला पंचायत समिती चांदुर बाजार येथील स्थानिक परिसरात आवास दिन व लाभार्थी मेळाव्याचे आयोजन व संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत स्वच्छ प्रभाग स्पर्धा व स्वच्छ ग्राम स्पर्धा 2018-19 चे पुरस्कार वितरण करण्यात आले होते.

प्रत्येक ग्रा प मधील उत्कृष्ट प्रभागाला पुरस्कार एकूण67,प्रत्येक जि प गटातील उत्कृष्ट ग्रा प ला पुरस्कार एकूण 6 चे वाटप करण्यात आले.या मध्ये घरकुल पुरस्कार
1.सर्वात जास्त घरे पूर्ण करणे,2.टक्केवारीनिहाय सर्वात जास्त घरे पूर्ण करणे,3.म ग्रा रो ह यो अभिसरण,4.आधार संलग्न करणे इत्यादी कामाचा समावेश होता.तसेच ग्रामीण पातळीवर काम करणारे  उत्कृष्ट काम करणारे ग्रा प कर्मचारी व रोजगार सेवक यांना गौरविण्यात आले.होते.

या कार्यक्रमांमध्ये उद्दिष्टानुसार घरकुलाचे काम पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींना तालुका, जिल्हा परिषद सर्कल, पंचायत समिती गण ,नुसार त्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये बेलोरा, घाटलाडकी, तोंडगाव, ब्राह्मणवाडा थडी, करजगाव, कृष्णापुर, आसेगाव, कुरणखेळ, शिरजगाव कसबा,माधान, काजळी आदी गावातील सरपंच, ग्रामसेवक यांना शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. चौथ्यांदा आमदार बच्चू कडू निवडून झाल्याबद्दल त्यांचे पंचायत समितीतर्फे व ग्रामसेवक संघटनेतर्फे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये आवास योजनेतील लाभार्थी तसेच सरपंच यांनी आपले मनोगत व्यक्त केले. चिंचोली काळे येथील सरपंच शिवाजी काळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,ड गटातील लाभार्थी हा,ब गटाच्या लाभार्थ्याला पेक्षा कधीकधी महत्त्वाचा असतो.

     यावेळी अचलपूर मतदारसंघाचे मा आमदार श्री बच्चूभाऊ कडू,मा सभापती,उपसभापती,जि प सदस्य,पं स सदस्य,सरपंच,उपसरपंच, ग्रामसेवक/ग्रा वि अ तसेच पं स कार्यालयातील सर्व विभागाचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. आवास योजनेत उत्कृष्ट काम केलेल्या ग्रा पं ना व कर्मचारी यांना यावेळी गौरविण्यात आले.