चांदुर बाजार येथील ग्राहकाचे तब्बल 17  सिलेंडर झाले गायब ग्राहकाच्या तक्रार वर अध्यपही कार्यवाही नाही

0
1343
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार येथील ग्राहकाचे तब्बल 17  सिलेंडर झाले गायब
ग्राहकाच्या तक्रार वर अध्यपही कार्यवाही नाही.

चांदुर बाजार:-

स्थनिक चांदुर बाजार येथील  कल्पना गॅस एजन्सी मधून चक्क ग्राहकाचे सिलेंडर गायब झाली असल्याची तक्रार करण्यात आली आहे.चांदुर बाजार येथील रहिवासी सुरज देव्हाते आणि प्रल्हादपूर येथील रहिवासी शशिकांत निचत यांनी आपली या बाबत ची तक्रार  एरिया सेल्स मॅनेजर,जिल्हाधिकारी, तहसीलदार चांदुर बाजार यांनी दिनांक 2 नोव्हेंबर ला करण्यात आली मात्र अध्यपही या वर कार्यवाही झाली नसल्याने ग्राहक यांनी ग्राहक मंचचा दरवाजा ठोठावणार आहे. यामुळे आता चांदुर बाजार येथील कल्पना एजन्सी ला ग्राहक मंच नोटीस लवकरच मिळणार असल्याची शक्यता आहे.

चांदुर बाजार येथील रहिवासी सूरज देव्हाते ग्राहक क्रमांक 628423 यांनी 20 सप्टेंबर 2019 ऑनलाईन बुकिंग केली होती मात्र त्यांना डिलिव्हरी चा संदेश प्राप्त झाला.तसेच सबसिडी जमा झाली पण प्रत्यक्ष मध्ये त्यांना सिलेंडर प्राप्त झाली नाही त्यामुळे त्यांनी 21 सप्टेंबर,22 सप्टेंबर,24 सप्टेंबर,27 सप्टेंबर 28 सप्टेंबर ,30 सप्टेंबर 2019 आणि ऑक्टोबर मधील दिनांक 1,3,5,6, बुकिंग केली.आणि प्रल्हादपूर येथील रहीवाशी शशिकांत निचत ग्राहक क्रमांक 612019 यांनी सुद्धा  जुलै महिन्यात दिनांक 14,21,8,2019 जून महिन्यात दिनांक 19,आणि 23 ला सिलेंडर ऑनलाइन बुकिंग केले चक्क त्यांची सबसिडी जमा झाली मात्र सिलेंडर होम डिलिव्हरी न झाल्याने ग्राहक यांनी तक्रार केली असून कल्पना गॅस एजन्सी मध्ये मोठया प्रमाणात गोरखधंदा सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.ग्राहक यांनी आमचे सिलेंडर दुसऱ्या विकले असल्याचा आरोप एजन्सी वर केला आहे.तर चांदुर बाजार येथील अनेक ठिकाणी व्यवसाय तसेच क्यातरींग व्यवसाय साठी मोठया प्रमाणावर घरगुती सिलेंडर वापर होत आहे.त्या मध्ये याच सिलेंडर चा वापर होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे .

तर एजन्सी मधून ग्राहक यांचे सिलेंडर त्यांना होम डिलिव्हरी न झाली आणि चक्क ग्राहक याना गॅस सिलेंडर प्राप्त झाल्याचा संदेश प्राप्त झाला आणि त्याची सबसिडी सुद्धा त्यांच्या बँक  खात्यात जमा झाली त्यामुळे आता कल्पना गॅस एजन्सी ही चांदुर बाजार नागरिकांची लूट करून व्यवसाय करणार्या याना त्याचा लाभ करून देत असल्याचे दिसत आहे.त्यामुळे एजन्सी वर कार्यवाही केली नाही तर ग्राहक मंच मध्ये जाणार असल्याचे ग्राहकांनी सांगितले.

बॉक्समध्ये
“ग्रामीण भाग असल्याने आम्ही ऑनलाइन बुकिंग घेत नसल्याचे गॅस एजन्सी मधील कर्मचारी यांचे म्हणणे आहे.त्यामुळे डिजिटल इंडिया चा चांदुर बाजार तालुक्यात फज्या उडत आहे असे दिसत आहे.

प्रतिक्रिया:-
” मी माझे सिलेंडर नेहमी ऑनलाइन बुकिंग करतो असतो आतापर्यत मला घरपोच सिलेंडर येत होते त्याचा चार्ज देखील मी भरत होतो. मात्र जून जुलै महिण्याचे माझे सिलेंडर मला प्राप्त झाले नाही त्यामुळे एजन्सी ने अधिक जास्त दराने माझे सिलेंडर व्यवसाय करणारे आणि कॅटरिग याना विकली असल्याची शक्यता आहे.याची चौकशी करून कार्यवाही झाली पाहिजे.”
1)शशिकांत निचत तक्रार दार प्रल्हादपूर

“डिजिटल इंडिया होत असताना ऑनलाइन बुक केल्यानंतर सिलेंडर घरी न येता गेले कोठे?हा सर्वात मोठा विषय आहे.मला सिलेंडर प्राप्त झाले नाही म्हणून मी वारंवार बुकिंग केली.मात्र बुकिंग सिलेंडर गेले कोठे?एजन्सी मालक च यावर पडदा टाकत असेल तरी यामध्ये काही तरी कालाबाजार असल्याचे दिसत आहे.तक्रार करूनही अध्यपही यावर कार्यवाही झाली नाही.त्यामुळे आता कार्यवाही झाली नाही तर ग्राहक मंच मध्ये तक्रार करणार आहे.”
2)सूरज संजय  देव्हाते तक्रारदार

“ग्राहकाच्या तक्रार वरून एजन्सी ला खुलासा मागितला आहे.त्यांनी खुलासा सादर केला असून चौकशी सुरू आहे.तसेच वारंवार बुकिंग केली असल्याने त्यांचा समस्या निर्माण झाली आहे.तर दुसऱ्या तक्रार दार याच्या तक्रार वर देखील खुलासा मागविला जाईल.”
3)शैलेश देशमुख पुरवठा विभाग अधिकारी चांदुर बाजार