चांदुर बाजार तालुक्यात स्वच्छ भारत मिशन चा फज्जा, अनेक गावांत बोर्ड पण हागणदारीमुक्त नाही. उद्दिष्ट पूर्तीसाठी गुड मॉर्निंग पथक गेले तरी कोठे? चांदुर बाजार:-

0
875
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार तालुक्यात स्वच्छ भारत मिशन चा फज्जा, अनेक गावांत बोर्ड पण हागणदारीमुक्त नाही. उद्दिष्ट पूर्तीसाठी गुड मॉर्निंग पथक गेले तरी कोठे?

चांदुर बाजार:-

चांदुर बाजार तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात हागणदारी मुक्त गावचे फलक लागले मात्र तालुक्यातील अनेक गाव ही कागदावर आणि फलक वरच हागणदारी मुक्त झाले असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.
हागणदारीमुक्त उद्दिष्ट पूर्तीसाठी प्रशासनाने गुड मॉनिर्ंग पथक स्थापन सुद्धा काहीच कार्यवाही न झाले पथक गेले तरी कोठे हा प्रश्न आहे.. आता अनेक गावातील नागरिक उघड्यावरच शौचाला जाताना दिसत आहे. त्याचे कुणालाही देणेघेणे राहिलेले नाही. राज्य शासनात गावाला हागणदारीमुक्तचा फलक लावून आपल्या कर्त्यव्य पार पाडून स्वत:ची स्वत:च पाठ थोपटून घेतली आहे.

शहरासह तालुक्यातील काही गावात सार्वजनिक शौचालय आहेत, त्याचा फारसा वापर होत असल्याचे दिसत नाही.तर तालुक्यात ग्रामपंचायत गट ग्रामपंचायती उदंड आहेत. एक नगर पंचायत आहे सर्व ठिकाणी शंभर टक्के शौचालय झाले असून, त्याच्या वापर होतो, असा प्रशासनाचा दावा आहे. सर्व कुटुंबियांना बारा हजार रुपये याप्रमाणे अनुदान वाटप झाले आहेत. यातील बहुतांश शौचालय बंद पडल्याचे विदारक चित्र तालुक्यात दिसून येत आहे.

केवळ अनुदान लागण्यासाठी बहुतांशी ठिकाणी शौचालयाचे बांधकाम केल्याचे दिसून येत आहे. शौचालय असूनही उघड्यावर जाणार्‍यांची संख्या वाढतच आहे. शौचालयाचा वापर करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचे दृष्य चांदुर बाजार शहरासह ग्रामीण परिसरात पहावयास मिळत आहे.
शौचालय बांधकामासाठी शासनाने शहरासह ग्रामीण भागात कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. यामागे ग्रामीण भागात वसलेला आपला देशातील तालुक्यातील सर्वच गावे हागणदारीमुक्त व्हावे हाच उद्देश होता. पण, तालुक्यासह शहरात हागणदारीमुक्त योजनेच्या फज्जा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. केवळ अनुदान लाटण्यासाठी बहुतांशी ठिकाणी शौचालयाचे बांधकाम केल्याचे दिसून येत आहे. शौचालय असूनही उघड्यावर जाणार्‍यांची संख्या वाढतच आहे. केवळ हागणदारीमुक्तीचे फलक दिसत असून, तालुका हागणदारीमुक्त झाल्याचे कागदोपत्री दाखवून प्रशासन स्वत:ची पाठ स्वत: थोपटून घेण्यात धन्यता मानत असल्याचे तालुक्यातील एकूणच वातावरणातून स्पष्ट होते.

ग्रामीण भागात तर बांधलेल्या शौचालयात जनावरांच्या चारा लाकडे गौर्‍या टाकाऊ वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.
घर तिथे शौचालय उभारण्याची संकल्पना अत्यंत चांगली असून, गावकर्‍यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने हागणदारीमुक्त हे शासकीय सोपस्कार ठरत आहे. अनेक लोकप्रतिनिधींच्या गावात प्रवेश करताना नाकाला रुमाल बांधावा लागतो, हे वास्तव्य चित्र कधी बदलेल? हा मोठा प्रश्न पडला आहे. एकूणच तालुक्यात हागणदारीमुक्तीचे तीन तेरा वाजून फज्जा उडाला आहे.