दि खामगाव अर्बन को ऑप बँक ली खामगाव५० व्या वर्षात पदार्पण…!

0
560
Google search engine
Google search engine

शेगांव:- दि खामगाव अर्बन को ऑप बँक ली खामगाव
शेगाव शाखेचे ५० व्या वर्षात पदार्पण
बिना सहकार नही उद्धार ‘या ब्रीद वाक्याला अनुसरून तब्बल ५६ वर्षांपूर्वी केवळ रु २५ रुपयाच्या भागभांडवलावर
खामगाव अर्बन बँक ग्राहकांच्या सेवेत रुजू झाली
खामगाव अर्बन बँकेची स्थापना विजयादशमी च्या शुभ मुहूर्तावर १९६३ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे
तत्कालीन प्रचारक दिवंगत श्री वसंतराव कसबेकर यांचे हस्ते करण्यात आली
बँकेस आतापर्यंत विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे यावर्षी सुद्धा देशपातळीवर अविज पब्लिकेशन
कोल्हापूर(KOLHAPUR ) यांचे वतीने बँको ब्लु रिबन या पुरस्काराने दुसऱ्यांदा सन्मानित करण्यात आले
संपूर्ण भारत देशामध्ये तालुका स्तरावरील मल्टीस्टेट शेड्युल्ड दर्जा प्राप्त एकमेव बँक म्हणून खामगाव अर्बन बँकेचा लौकिक आहे
बँकेस सतत ५ वर्षांपासून ऑडिट वर्ग A ग्रेड प्राप्त आहे बँकेचे संचालक मंडळ मा अध्यक्ष आशिषजी चौबिसा ,उपाध्यक्ष श्री नरेंद्रजी करेसिया पालक संचालक शेगाव शाखा
श्री पुरुषोत्तमजी काळे व मा प्रबंध संचालक श्री अरुणजी दुधाट यांचे मार्गदर्शनात बँकेची घौडदौड सुरु आहे खामगाव अर्बन बँकेचा शाखा विस्तार होत असतांना दिनांक १० डिसेंबर १९७० रोजी शेगाव येथे बँकेची शाखा सुरु करण्यात आली आज रोजी शेगाव शाखेस ४९ वर्ष पूर्ण होऊन ५० व्य वर्षात शाखा पदार्पण करीत आहे या मध्ये शेगाव परिसरातील मा सभासद,ग्राहक व ठेवीदार तसेच विविध प्रकारच्या संस्थांचे सहकार्य आहे.
आज दिनांक १० डिसेंबर रोजी शाखेत सकाळी सत्यनारायणाची पूजा व तीर्थप्रसादाचे आयोजन केले होते त्यामध्ये मोठ्याप्रमाणात ग्राहक व सभासदांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला ग्राहक व सभासदांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच शेगाव येथील लवकुश शिशुमंदिर इंदिरानगर येथे शाखेचे मा पालक संचालक श्री पुरुषोत्तम काळे शाखा समिती सदस्य श्री मनीष पनपालिया व विश्वहिन्दू परिषदेचे जिल्ह्हा मंत्री श्री चंद्रकांतजी घोराळे,श्रीकृष्ण गावंडे नितीन अवस्थी योगेश भारद्वाज ईश्वर कराळे तसेच कीर्तीभाऊ संघानी जिल्ह्हा सह सेवा प्रमुख तसेच शेगाव शाखेचे शाखाधिकारी श्री प्रफुल खराटे
उपशाखाधिकारी श्री गोपाळ सावरकर श्री मोरे तसेच सर्व कर्मचारी वृंद यांचे हस्ते विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच मोदी नगर येथील शिशुमंदिरात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
बँकेने वर्धापन दिनानिमित्त शेगाव नगराचे नाव राष्ट्रीय स्तरावर चमकवणाऱ्या विद्यार्थ्यांचे भेट वस्तु देऊन कौतुक केले. यामध्ये शेगाव नगराचे इंदिरा गांधी विद्यालयाची विद्यार्थिनी कु. प्राची अमोल टावरे व सेंट झाविअर इंग्लिश कॉनवेंट चा विध्यार्थी रुद्र विजय ढगे यांनी राष्ट्रीय स्थरावर एरोबीक जिमन्याशीयम मध्ये
प्राविण्य प्राप्त केले .त्यानिमित्त प्रोत्साहन देण्याकरिता मुलांचा व त्यांचे पालकांचा सत्कार करण्यात आला.
शेगाव शाखा ज्यावेळी शेगाव नगरात स्थापन झाली त्यावेळेस ज्या लोकांनी बँकेस सहकार्य केले अश्या जेष्ठ सभासदांचे कृतघनता व्यक्त करण्याकरीता त्यांचे घरी जाऊन त्यांचा सत्कार शाखेचे मा पालक संचालक श्री पुरुषोत्तमजी काळे शाखा समिती सद्यस्य श्री. मनीषजी पंनपालिया शाखाधिकारी श्री प्रफुल खराटे,उपशाखाधिकारी श्री गोपाल सावरकर व शंकर आढाव व कर्मचाऱयांनी केला. जेष्ठ सभासद श्री. जगदीशजी नारणोलीया,श्री.नंदूशेठ मुरारका,श्री. गोमाजी महाराज संस्थान चे अध्यक्ष श्री. धनंजनयदादा पाटील,श्री. प्रकाश शेळके,श्री.विलासकाका काठोळे,श्री श्रीरामजी पुंडे यांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार केला त्यांनी या प्रसंगी बँकेचे कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. वर्धापन दिनाचे औचित्य साधुन खातेदारांनी बचत खाते व आर डी चे एकूण एकावन्न खाते आज रोजी उघडले आहेत. व पुढील कालावधी मध्ये आणखी खाते उघडणार आहेत. शाखेची मार्च १९ ची आर्थिक स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शाखेचे एकूण ठेवी ४२ कोटी एकूण कर्ज २२ कोटी असुन मार्च १९ ला शाखेचा व्यवसाय ६४ कोटी पर्यंत आहे. या मध्ये शेगाव परीसरातील लोकांचे “नातं विश्वासाचं “असल्यामुळे हे शक्य झाले.