अवैध रेतीने भरलेल्या ट्रँक्टरवर कारवाई

0
454
Google search engine
Google search engine

सिंदेवाही- ११ डीसेबरला पहाटे ४-२० वाजाताच्या दरम्यान रेती भरलेला ट्रँक्टर सिंदेवाही-शहराच्या मच्छी गुजरी समोरील मुख्य मार्गा वरून येतांना दिसला असता सिंदेवाहीचे तहसीलदार गणेश जगदाळे यांनी त्या रेतीने भरलेल्या ट्रँक्टरला थांबवून चौकशी केली असता ट्रँक्टरची टीपी नसल्यामुळे त्या ट्रँक्टरला पकडला व तहसिल कार्यालयाच्या आवारात जमा केले. त्या ट्रँक्टरवर तहसिलदार गणेश जगदाळे  यांनी जप्तीची कारवाई केली आहे.

ट्रँक्टर क्र.–MH-३४ BF-३४५४ असा असून सदर ट्रँक्टर संदीप नारायण भरडकर यांच्या मालकीची असल्याचे तहसीलदार सिंदेवाही यांनी सांगितले व रेतीने भरलेल्या ट्रँक्टर वर १ लाख ८ हजार ४०० रुपये दंडात्मक कारवाई केली असून असा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी चिमूर (SDM) यांच्याकडे पाठवण्यात आले आहे अशी माहिती सिंदेवाही तहसीलदार यांनी सांगितले आहे.