कु. पल्लवी हींगणकर विद्यापीठातून द्वितिय – कला शाखेच्या गुणवत्ता यादीत

0
555
Google search engine
Google search engine

आकोटः संतोष विणके :-
स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालयाची कला शाखेची विद्यार्थीनी कु.पल्लवी दिवाकर हिंगणकर कालवाडी हिने कला पारंगत (इतिहास)एम.ए परिक्षेत ७८९गुण मिळवून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातून गुणवत्ता यादीत द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.या स्पृहनिय यशाबद्दल कु.पल्लवीचे अभिनंदन होत आहे.

ग्रामिण भागातील विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्तेत नेत्रदिपक यश प्राप्त करित असल्याचे पल्लवीच्या यशाने दिसून येते.पल्लवी दिवाकर उर्फ दिपक एकनाथराव हिंगणकर यांची कन्या आहे.तीने आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य डाॕ अंबादास कुलट,कॕप्टन डाॕ प्रा प्रशांत कोठे तथा आईवडीलांना दिले.कालवाडी ग्रामपंचायतचे सरपंच राहुल हिंगणकर यांनी पल्लवीचे अभिनंदन केले आहे.