कु. पूनम ताडे व कु. रचना तेलगोटे वाणिज्य विभागाच्या गुणवत्ता यादीत

0
743
Google search engine
Google search engine

आकोटः संतोष विणके –

स्थानिक श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोट येथील वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनी कु. पूनम रामकृष्ण ताडे व कु. रचना दिलीप तेलगोटे या दोन विद्यार्थ्यांनींनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी 2019 च्या बीकॉम परीक्षेच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. पूनम हि 82.06 टक्के गुण मिळवून चौथी मेरिट तर रचना ही 81.78 टक्के गुण मिळवत सहावी मेरीट आली असून दोघींनीही अकोट च्या शैक्षणिक क्षेत्राचा नावलौकिक वाढवला आहे कु पूनम ताडे ही अंबोडा येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांची मुलगी आहे तिला राज्य सेवेमार्फत विक्रीकर अधिकारी व्हायचे तर कु. रचना तेलगोटे ही आकोट येथील असून तिचे वडील मजुरी करतात तिला भारतीय प्रशासकीय सेवे मार्फत प्रथम वर्ग अधिकारी व्हायचे आहे. ह्या विद्यार्थिनी ग्रामीण भागातील आणि सामान्य कुटुंबातील असून त्यांनी मिळवलेल्या या यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयांमध्ये त्यांचा कौटुंबिक सत्कार घेण्यात आला तसेच महाविद्यालयाच्या कुमारी निशा राजेश रेळे कुमारी आचल रामदास वारकरी कुमारी निशा पुरुषोत्तमजी महल्ले या विद्यार्थिनींचा अनुक्रमे एक दोन आणि पाच अशा अतिशय कमी गुणांनी मेरीट गेला त्यांच्या कठोर मेहनतीचे देखील कौतुक करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉक्टर ए एल कुलट यांनी सर्व विद्यार्थ्यांनींचे कौतुक केले तसेच वाणिज्य विभागाने यशाची परंपरा कायम ठेवल्याचे समाधान व्यक्त केले विद्यार्थिनींनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य डॉ.वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ. सुनील पांडे प्राध्यापक जी वाय वानखडे प्रा. अविनाश पवार प्रा. ज्ञानेश्वर सोनवणे सुरेंद्र देशमुख प्रवीण बोंद्रे गजानन खारोडे सोनिया गोरार प्रकाश निमकर नयना भट्टी अर्चना मोहोकार सोनू सराटे रेणुका पुंडकर आणि मनीष निमकर योगिता आडे आणि आई-वडिलांना दिले आहे