श्री नरसिंग विद्यालयात सुदृढ भारत अभियान क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन

0
426

आकोटः ता.प्रतीनीधी

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे वतीने नियोजित करण्यात आलेल्या फीट इंडिया मुव्हमेंट च्या अंतर्गत सुदृढ भारत अभियन क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन श्री नरसिंग विद्यालय आकोट मधे आज सकाळी शिक्षण प्रसारक मंडळ आकोट चे सचिव श्री सुधीर जोत यांचे हस्ते करण्यात आले.
या वेळी मंचावर योगतज्ञ श्री गाडगे सर, मुख्याध्यापक श्री एम. के. उंटवाले, जेष्ठ शिक्षक श्री संतोष एडणे यांची उपस्थिती होती.
विविध खेळ व क्रीडा स्पर्धांमधे भाग घेवून आपले चारित्र्य निर्माण करण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना श्री सुधीर जोत यांनी आपल्या भाषणात दिला व खेळाचे जीवनातील महत्व सांगितले.
क्रीडा सप्ताहाच्या पहिल्या दिवशी श्री संजय गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना योगाचे जीवनातील महत्व सांगितले. चिरंजीव संचित व अर्पिता गाडगे व कू. चिकटे हिने विविध योगासने करून दाखवली व त्यांचा सराव उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी केला.
सदर कार्यक्रमाला शाळेचा विद्यार्थी वर्ग, पालक, शिक्षक, कर्मचारी व अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते.
हा क्रीडा सप्ताह अंतर्गत उद्घाटन उद्घाटन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी एन. सी. सी अॉफिसर श्री सचिन इंगळे यांच्या सह एन सी सी कॅडेट नई मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महेश मोडक सर तर आभार प्रदर्शन श्री निलेश हेलगे सर यांनी केले.
खेळा आनंदासाठी खेळा आरोग्यासाठी या घोषणेसह सुरू असलेल्या या क्रीडा सप्ताहात दिनांक 12 ते 18 दरम्यान दररोज नवनवीन खेळांचे प्रशिक्षण, स्पर्धा, शर्यती प्रदर्शनाचे आयोजन सकाळ व दुपार सत्रातून करण्यात आले असुन त्यामधे पालकांनाही सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.