शेगांव श्री दत्त जन्मोत्सव उत्साहात साजरा

0
424
Google search engine
Google search engine

शेगांव श्री दत्त जन्मोत्सव उत्साहात साजरा
शेगाव :- दि.१४ स्थानिक श्री संत गजानन महाराज मंदिरा जवळील श्री दत्त अवधूत मंदिरामध्ये श्री दत्त जन्मोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या हर्षोल्हासात पार पडला.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री दत्त मंदिरात गेल्या सात दिवसांपासून मदिराचे संचालक सुधीर उगले यांनी श्रीगुरुचरित्राचे पारायण केले तसेच शेगाव शहरातील मोदी नगर मधील नारायण महाराज चीतोडे, बंडू महाराज कोठे, संजय भालतीलक, प्रल्हादाराव वानखडे आणि महिला मंडळ यांनी रात्र भजन सोळस पूजा केली पहाटे पाच वाजता श्री दत्तजन्माचा सोहळा आनंदाने पार पडला. दुसऱ्या दिवशी दिनांक १२ डिसेंबर २०१९ ला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले या महाप्रसादाचा लाभ शहरातील भाविकांनी घेतला तसेच बाहेर गावातील भक्तांनी श्री दत्त भगवानचे दर्शन घेतले उत्सवानिमित्त श्री दत्त मंदिरवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.