घरकुल योजनेच्या कामासाठी रेती व मुरूम उपलब्ध करून द्या – घुईखेड येथील लाभार्थ्यांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

0
433
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे –
अनेकांना स्वत:चे घर नव्हते, होते ते कच्चे व कुडाचे होते. पाऊस, वारा आदी आपत्तीने घर पडण्यासारखे झाले होते. अशा वेळी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घर मंजुर झाले. परंतु लाभार्थ्यांचे स्वप्न अपुर्णच राहत असल्याचे चित्र ग्रामिण भागात आहे. रेती उपलब्ध नसल्यामुळे लाभार्थ्यांचे घर बांधकाम करण्यास सुरूवात झाली नसुन तत्काळ रेती व यासह मुरूम सुध्दा उपलब्ध करून द्यावे अशी मागणी चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील नागरिकांनी नवनिर्वाचित पंचाय समिती सदस्या सौ. शुभांगी खंडारे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे.
सुरूवातीला पंतप्रधान घरकुल आवास याेजनेत घर बांधताना लाभार्थींना वाळूच मिळत नव्हती. यामुळे या याेजनेतील घरांसाठी काेणतीही राॅयल्टी न आकारता जवळपास ५ ब्रासपर्यंत वाळू माेफत देण्याची घाेषणा तत्कालीन मुख्यमंत्री यांनी केली होती. यानंतर त्यावर प्रशासनाकडून अंमलबजावणी करण्यात येत होती. परंतु सप्टेंबरच्या शेवटी रेतीघाट बंद झाले. व यानंतर सर्वांना रेतीही मिळणे बंद झाले. अशातच चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड हे गाव बेंबळा प्रकल्पामध्ये संपादित करण्यात आले. शासन निर्णयानुसार त्यांना भूखंड मिळाले व त्याठिकाणी ते कच्च्या घरामध्ये राहत होते. शासनाच्या मदतीने काहींनी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेचा लाभ घेतला. परंतु घरकुल पात्र लाभार्थ्यांना बांधकाम करण्याकरिता रेती व मुरूम उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे रेतीसह मुरूम सुद्धा उपलब्ध करून द्यावे अशी मागणी येथील नागरिकांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.  यावेळी पंचायत समिती सदस्य शुभांगी खंडारे, पंचायत समिती माजी सभापती डॉ. हेमंत जाधव, भाजपा अल्पसंख्यांक अध्यक्ष शेख ताजमोहम्मद, घुईखेड ग्रामपंचायत सदस्य सचिन मेहर, घुईखेड भाजपा सर्कल प्रमुख लहानु मेश्राम, अमोल खंडारे, भाजपा तालुकाध्यक्ष पप्पु गुल्हाणे, संदिप सोळंके, रवींद्र उदयकर, सोमेश्वर भोयर, रामू शेंडे,  रवींद्र शेंडे, दिनेश शेंडे, मारोती मेश्राम, देवराव शेंडे, दिलीप दातखोरे, शेख अफरोज, गंगाराम नांदणे, सचिन नवघरे, संदीप ठाकरे, रामचंद्र भोयर, दिनेश चौधरी, केशव गोंडाणे, बजरंग शिंदे, रामदास मदन, संजय गोंडाणे, लक्ष्मण मेश्राम, अविनाश तिवाडे यांसह अनेकांची उपस्थिती होती.