नागपूर विधानभवनावर धडकणार मुस्लिम आरक्षणासाठी आणि एन.आर.सी. विरोधात मुस्लिम परिषदेचा राज्यस्तरीय मोर्चा

0
575
Google search engine
Google search engine

नागपूर. ( विशेष प्रतिनिधी ) – भारतीय मुस्लिम परिषद या संघटनेच्या वतीने 19 डिसेंबर रोजी सकाळी 12 वाजल्यापासून चिटनवीस पार्क महाल नागपूर येथून राज्यस्तरीय मुस्लिम आरक्षण आणि येणार एन.आर.सी विरोधी मोर्चा विधानभवनावर प्रा. जावेद पाशा यांच्या नेतृत्वत निघणार आहे.

महाराष्ट्रात 13 जुलै 2014 रोजी काँग्रेस – राष्ट्रवादीने राज्याच्या मागासवर्गीय मुस्लिमांना  अध्यादेशाद्वारे 5 % आरक्षण प्रधान केले होते. परंतु, फडणवीस सरकारने धर्माचे कारण पुढे करून हे आरक्षण नाकारले होते. जेव्हा की, या आरक्षणास सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक मागासलेपणा हे संवेधानीक निकष होते. आता राज्यात शिवसेना –  राष्ट्रवादी – काँग्रेस यांची सत्ता आल्यामुळे महाराष्ट्रातील मुस्लीम जनतेसोबत न्याय व्हावा आणि  5 % आरक्षण पुर्नस्थापित करावे या मागणीसाठी आणि सोबतच एन.आर.सी चा कायदा हा नुकत्याच पारित केलेला नागरिक अधिकार संशोधन बिलाच्या माध्यमाने धार्मिक धर्तीवर भारतीय जनतेचे मुसलमान आणि गैर मुसलमान हिंदू असे असंवेधानिक नागरिक विभाजन करण्यात येत आहे. जे स्पष्टपणे संविधानाचे आर्टिकल 14 आणि 26 चे उल्लंघन आहे. भारतातील हिंदू असो वा मुसलमान यातील किमान 40 % लोक अशिक्षित तर आहेत, पण ग्रामीण भागात अत्यंत मागास, परंपरागत व्यवसायात आहेत. बहुतांश यांच्याकडे एन.आर.सी नुसार भारतीयत्व सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रके असण्याची शक्यता नाही, अशा वेळेस कागद नसलेल्या हिंदू आणि मुसलमानांपैकी वर्तमानात आलेल्या नागरिक  संशोधन बिलाच्या मान्यतेनुसार मुसलमानांना नागरिकत्व नाकारले जाण्याची आणि कागदपत्र नसले तरी किंवा मुस्लिमेतर इतर धर्मीय आहेत म्हणून नागरिकत्व प्रदान केले जाणार असल्यास हे देशाचे दुसरे विभाजन ठरणार आहे, असे मत जावेद पाशा यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले. तसेच हे भारताच्या प्रास्ताविकेचे आणि धर्मनिरपेक्ष लोकशाही चे उल्लंघन ठरणार आहे म्हणून या मोर्चात मुस्लिम आरक्षणाच्या मागणीची सह एन.आर.सी च्या विरोध केल्या जाणार असून महाराष्ट्र शासनाने एन.आर.सी लागू करू नये आणि मुस्लिम आरक्षणाची स्थापना या मागणी भारतीय मुस्लिम परिषद या संगठनेने मोर्चाचे आयोजित केला असून प्रा. जावेद पाशा नेतृत्व करित आहेत.

या मोर्चाला जमायते इस्लामी हिंद चे डॉ. अनवर सिद्दिकी, जमियत उल्मा हिंद नागपूर चे शिराज अहमद कासमी साहाब, स्वराज अभिमान महाराष्ट्र राज्यचे मानव कांबळे,  समता सैनिक दल ऍड. स्मिता कांबळे, मु. से. सं चे फिरोज मसुलदार, ओबीसी महासंघ प्रा. शरद वानखडे, मुस्लिम विकास मंच अध्यक्ष हाजी परवेज बेग, मूव्हमेंट पिस अ‍ॅण्ड जस्टिस चे शकील मोहंमदी, मुस्लीम विकास परिषद चे मराठा खान, आदी संघटनांचा पाठिंबा असून हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. बौद्ध युवा संस्था, मराठा सेवा संघ स्थानिक शाखा, विविध संघटनांच्या समर्थान प्राप्त आहे.

मोर्चाचे आमंत्रण नागपूरचे शकील पटेल असून हनिफ कुरेशी, हाफिस अब्दुलबासीत,आफिज अक्तर, मास्टर वकील नजीब, वकील परवेश साहब, जावेद रंगूनवाला, सुहेल शेख, हिफजुर रहमान खान, शाहीद रंगूनवाला, वकारुद्दीन अन्सारी, निजामुद्दीन अन्सारी, शमीम एजाज, मक्सुदभाई आलमारीवाले, जावेद अन्सारी आदींची संयोजन समिती आहेत. या मोर्चात पुणे येथून इब्राहिम खान, लातूर येथून अजमत पठाण, परभणी येथून मेहबूब शेख सर, नांदेड येथून मोहम्मद हबीब मौलाना, अयुब मौलाना, अमरावती येथून याहयाखान पठाण, बडनेरा राशीद शेख, चंद्रपूरचे ऍड. नाजीम खान, राजीक शेख, शरीफ सर, वाहाब शेख, वहिद खान, तारिक शेख, शाहिस्ता खान, शाहीन शेख, सायरा शेख, नाशिक येथून हाजी बाबाखान पठाण, औरंगाबाद येथून दानिश कुरेशी, आसिफ अबरार खान, गडचिरोली येथून पत्रकार नसीर जुम्मन शेख, गोंदिया येथून मिर्जा वहाद बेग, वर्धा येथून मिर्जा परवेज बेग, साकोली येथील राशीद कुरेशी, यवतमाळ येथून नईम अजीज, आबिद कुरेशी, जर्रार खान, भंडारा येथून फिरोज अहमद, नरखेड येथून इस्लाइल बारुदवाला, मुस्लिम ब्रिगेड संघटना नागपूर चे सुफि टायगर आदी नेतृत्वात लोक या मोर्चात सामील होणार आहेत.