भुमीपुत्रांचे विवाह योग सहजतेने जुळविण्यासाठी मध्यस्थींचा पुढाकार प्रशंसनिय – ह.भ.प.वासुदेवराव महल्ले

0
544
Google search engine
Google search engine

भुमीपुत्रांचे विवाह योग सहजतेने जुळविण्यासाठी मध्यस्थींचा पुढाकार प्रशंसनिय – ह.भ.प.वासुदेवराव महल्ले

ग्रामिण युवक-युवती परिचय मेळाव्याला उत्फूर्त प्रतिसाद
————————-
आकोटः संतोष विणके
विवाह योग सहज व सुलभतेने जुळविण्यासाठी मध्यस्थी मंडळाच्या निरंतर सेवेत एक पाऊल पुढे टाकत मध्यस्थी ग्रामिण युवक-युवती परिचय मेळावा आयोजित करुन मंडळाने सामाजिक बांधिलकीचा परिचय घडविला आहे.भूमिपूत्र व भूमीकन्येचे विवाह योग घडवून आणण्यासाठी हा उपक्रम प्रशंसनिय आहे असे प्रतिपादन श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प.श्री वासुदेवराव महल्ले यांनी केले

मध्यस्थी वधू-वर सुचक मंडळ आकोट द्वारा श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे ग्रामीण भागातील विवाह इच्छूक युवक-युवती व त्यांचे पालकांचा मेळावा पार पडला.यावेळी वासुदेवराव महल्ले बोलत होते.याप्रसंगी दर्यापूरचे दिनकरराव गायगोले, संस्थेचे उपाध्यक्ष बाबाराव बिहाडे कोषाध्यक्ष पुरुषोत्तम लाजुरकर,सचिव रविंद्र वानखडे,सहसचिव मोहनराव जायले,अवि गावंडे,विश्वस्त सदाशिवराव पोटे,दादाराव पुंडेकर,डाॕ अशोकराव बिहाडे,सदाशिवराव पोटे,जयदिप सोनखासकर महादेवराव ठाकरे ,सुनंदाताई आमले,कमलताई गावंडे,अशोकराव पाचडे,अनिल कोरपे,अॕड.शिरिष ढवळे, डी.ओ.म्हैसणे आदी उपस्थित होते.

गुरुपुजन व दिप प्रज्वलनाने मेळाव्याला प्रारंभ झाला.विवाह योग्य ग्रामीण मुला मुलींचा परिचय मेळाव्याला आज उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. १६३ मुलामुलींनी नोंदणी करुन यावेळी परिचय दिला.

पुणे व अमरावती येथे मध्यस्थी मेळाव्याचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल अनुक्रमे महादेवराव सावरकर व बाळकृष्ण आमले या मध्यस्थी शाखांच्या अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.मध्यस्थी वेबसाईटचे प्रमोटर सोपान आमले यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकिशोर हिंगणकर यांनी केले.यावेळी दिनकरराव गायगोले,मध्यस्थी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब फोकमारे ,सुरेशदादा कराळे , बाळकृष्ण आमले, यांनी मनोगत व्यक्त केले.नागोराव वानखडे यांनी मध्यस्थी गीत सादर केले.

कार्यक्रमाचे संचालन प्रा.डी.आर.साबळे आभार प्रदर्शन मंडळाच्या सदस्या सौ.ज्योतीताई कुकडे यांनी केले.

मेळावाला प्रा.साहेबराव मंगळे,मधुकरराव पुंडकर,भाष्करराव डिक्कर,गजानन महल्ले, रामदास मंगळे,सुधाकरराव हिंगणकर ,विनायकराव कुकडे,राममुर्ती वालसिंगे, तथा ग्रामिण भागातील समाज बांधव उपस्थित होते.