चंद्रपूर जिल्‍हयातील नुकसानग्रस्‍त शेतक-यांना त्‍वरित मदत द्यावी – आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी @SMungantiwar

132
जाहिरात

ऑक्‍टोबर आणि नोव्‍हेंबर महिन्‍यात चंद्रपूर जिल्‍हयात झालेल्‍या अवकाळी पावसामुळे शेतक-यांच्‍या शेतपिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. प्रामुख्‍याने कापुस, सोयाबीन, धान पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदील झाला आहे. शेतक-यांच्‍या नुकसानाचे पंचनामे होवुनही अद्याप त्‍यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. नुकसानग्रस्‍त शेतक-यांना त्‍वरित मदत राज्‍य शासनाने देण्‍याची मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत कपात सुचनेच्‍या माध्‍यमातुन केली.
दि. 19 डिसेंबर रोजी महसुल व वनविभागावरील पुरवणी मागण्‍यांवरील चर्चेत वरिल विषयांच्‍या अनुषंगाने कपात सुचनांच्‍या माध्‍यमातुन शासनाचे लक्ष वेधले आहे. चंद्रपूर जिल्‍हयातुन वाहणा-या वैनगंगा, वर्धा, इरई, पैनगंगा, उमा, गोधणी, अंधारी, शिर या नद्यांशेजारील गावांमध्‍ये सातत्‍याने निर्माण होणारी पुरपरिस्थिती लक्षात घेता या गावांमध्‍ये आपत्‍ती व्‍यवस्‍थापनाच्‍या दृष्‍टीने प्रत्‍येक तालुक्‍यात आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कक्ष उघडण्‍याची मागणी त्‍यांनी केली आहे. जलसंपदा विभागाने 86 गावे पुरप्रवण म्‍हणुन निश्‍चीत केली आहे. पुरपरिस्थिती दरम्‍यान शेती, घरे, गुरांचे नुकसान होते. त्‍यामुळे पुरग्रस्‍त गावे तसेच नुकसानाबद्दल प्रत्‍येक कर्मचा-याची भुमिका व कर्तव्‍ये यासाठी जिल्‍हा स्‍तरावरील आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कक्ष सक्षम करण्‍याची आवश्‍यकता त्‍यानी प्रतिपादीत केली आहे.
नगरविकास विभागावरील पुरवणी मागण्‍यांवर दाखल केलेल्‍या कपात सुचनेच्‍या अनुषंगाने त्‍यांनी चंद्रपूर जिल्‍हयाचे आराध्‍य दैवत असलेल्‍या माता महाकाली देवस्‍थानाच्‍या सौंदर्यीकरणासाठी मंजुर 60 कोटी रु. निधी अंतर्गत विकासकामांना त्‍वरित सुरुवात करावी अशी मागणी केली तर ग्रामविकास विभागाच्‍या पुरवणी मागण्‍यांवर चंद्रपूर जिल्‍हा परिषदेअंतर्गत विविध इमारतींच्‍या बांधकामासाठी प्रामुख्‍याने प्राथमिक आरोग्‍य केंद्रे व शाळा खोल्‍यांचे बांधकाम यासाठी निधी मंजुर करण्‍याची मागणी त्‍यांनी केली.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।