*वीज पुरवठा खंडित करून ग्राहकांना वेळेत वीज बिल भरण्याची सवय लावा ; संचालक दिनेशचंद्र साबू*

0
883

*वीज पुरवठा खंडित करून ग्राहकांना वेळेत वीज बिल भरण्याची सवय लावा ; संचालक  दिनेशचंद्र साबू*

• *विविध विकास कामाचा आढावा घेण्यात आला*

• *कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गोपनीय अहवालात नोंद*

• *अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याची आढावा बैठक*

*अमरावती , दि. २४ डिसेंबर २०१९*

थकबाकीदार ग्राहकांकडे वीज बिल भरण्यासाठी वारंवार चकरा मारून वेळ खर्ची करण्यापेक्षा त्या ग्राहकांचा वीज पुरवठा थेट खंडितच करा आणि हा वेळ ग्राहक सुविधा आणि देखभाल दुरूस्तीवर करा, तसेच खंडित केलेला वीज पुरवठा पुनर्रजोडणीसाठी ग्राहकांना पुनर्रजोडणीचा दंड भरून २४ तासापर्यंत अंधारात रहावे लागू शकते याची जाणीव करून द्या असे निर्देश संचालक संचलन दिनेशचंद्र साबू यानी दिले. यावेळी सर्व उपविभागीय अभियंतांना वीज पुरवठा खंडित करण्याचे उध्दीष्ट नेमुण देण्यात आले आणि उध्दीष्ठ पुर्ण न करणाऱ्यावर कारवाई करण्याचा गर्भित ईशाराही यावेळी त्यांनी दिला.

विद्युत भवन अमरावती येथे परिमंडळातील यवतमाळ आणि अमरावती जिल्हयाच्या आढावा बैठकित ते बोलत होते. या बैठकिला मुख्य अभियंता सुचित्रा गुजर,अधिक्षक अभियंता दिलीप खानंदे ,अनिल वाकोडे यासोबतच कार्यकारी अभियंते भारतभूषण औगड, हेमराज ढोके,धर्मेंद्र मानकर, आनंद काटकर ,दिपक आघाव,योगेश वारके ,संजयकुमार चितळे ,संजय आडे,मंगेश वैद्य,उत्तम वानखडे, प्रणाली विश्लेषक नितीन नांदुरकर ,वरिष्ठ व्यवस्थापक शिरीष शहा प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी उपविभागनिहाय सुरू असलेल्या विशेषता शेतकऱ्यांसाठी महत्वाकांक्षी असणारी उच्चदाब वितरण प्रणाली योजना (HVDS), मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना , आदी विकासात्मक योजनांचा आणि ईतर सुधाराणात्मक कामांचा सविस्तर आढावा घेत यातील कामाला अधिक गती देण्याच्या सुचना यावेळी त्यांनी केल्या. तसेच महावितरणकडे पैसे भरून प्रलंबित असलेले उच्च दाब व गैरकृषी ग्राहक यांना तात्काळ वीज जोडण्या देण्याचेही यावेळी त्यानी निर्देश दिले.ग्राहकांना सुरळीत आणि दर्जेदार सेवेसाठी एक पाऊल पुढे करत महावितरणचे प्रतिबंधात्मक देखभाल दुरूस्तीवर भर राहणार असल्याने त्यादृष्टीने एम्पॅनेल केलेल्या विविध कामाचा आढावाही यावेळी घेण्यात आला.

तसेच जास्त वितरण हानी असलेल्या विद्युत वाहीनीवरील वितरण हानी कमी करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाय योजनाचा आढावा घेतांना श्री. साबू म्हणाले की, महावितरणच्या सुधाराणात्मक धोरणानुसार जे कर्मचारी आपल्याला नेमुण दिलेल्या कार्यालयाअंतर्गत असलेली थकबाकी कमी करण्यासाठी प्रयत्न करणार नाही , ज्यांच्या परिसरात रोहीत्रे जास्त निकामी होतात ,वारंवार वीज पुरवठा खंडित होतो ,वितरण हानी वाढत आहे या व त्यांनी दिलेल्या ग्राहकसेवेची यापुढे त्या कर्मचाऱ्यांच्या वार्षिक गोपणीय अहवालात नोंद घेतली जाणार आहे . कर्मचाऱ्यांच्या गोपणीय अहवालावरच त्यांची पुढील पदोन्नतीची प्रक्रीया राहणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला अमरावती परिमंडळाअंतर्गत असलेल्या दोनही जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अभियंते , वित्त व लेखा विगाचे अधिकारी,स्थापत्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

*जनसंपर्क अधिकारी*
*महावितरण अमरावती परिमंडळ*