महसूल व ऊर्जा मंत्री बाळासाहेब थोरात शुक्रवारी जिल्ह्यात

0
1090
Google search engine
Google search engine

अमरावती – राज्याचे महसूल, ऊर्जा, शालेय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण,पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री बाळासाहेब थोरात, हे उद्या शुक्रवार, (27डिसेंबर) जिल्हा दौ-यावर येत आहेत.

त्यांचा दौरा खालीलप्रमाणे- सकाळी 8.15 वाजता नागपूर येथून अमरावतीकडे प्रयाण करतील. सकाळी 11.00 वाजता श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती येथे आगमन व शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 121 व्या जयंती उत्सवास उपस्थित राहतील.

शासकीय विश्रामगृह येथे दुपारी 1.00 ते 2.00 वाजता दरम्यान राखीव. दु. 2 वा. सिद्धी मंगल कार्यालय येथे अमरावती जिल्हा ग्रामीण काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती, दुपारी 3.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा काँग्रेस कमेटीच्या पदाधिका-यांशी चर्चा, दुपारी 4 ते  5 वा. दरम्यान शासकीय विश्रामगृह येथे राखीव, सायंकाळी पाच वाजता अमरावती येथून मोटारीने नागपूरहून प्रयाण.