द पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशन कडून रक्त तपासणी ला उत्कृष्ट असा प्रतिसाद 250 ते 300 नागरिकांनी घेतला लाभ

204
जाहिरात

द पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशन कडून रक्त तपासणी ला उत्कृष्ट असा प्रतिसाद
250 ते 300 नागरिकांनी घेतला लाभ

चांदुर बाजार

स्व.रामबीलासजी साबू व स्व.प्रेमलता रा.साबू
यांच्या स्मृति प्रित्यर्थ द पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशन चांदुर बाजार तालुका कार्यकरणी यांच्या सौजन्याने शिरजगाव कसबा येथे नागरिकांच्या शरीरातील 16 प्रकारची विनामूल्य रक्त तपासणी व्हावी याहेतूने पत्रकार संघटनेने या तपासणी ही स्वस्थ भारत अभियान आणि द पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशनच्या मदतीने आयोजित करणयात आले होते.

चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील स्थानिक बालमुकूद राठी विद्यालय मध्ये या कार्यक्रम चे आयोजन करणयात आले होते.यावेळी स्वस्थ भारत अभियानचे संचालक मा.श्री.राजेशजी साबू व महावितरण कंपनीचे संचालक व संचलन मा.श्री.दिनेशचंद्रजी आर.साबू तसेच महावितरण चे अधिक्षक अभियंता दीपक खांनदे ,आणि त्यांची टीम उपस्थित होती.जिल्हा परिषद सदस्य सुखदेव पवार, पंचायत समिती उपसभापती नितीन टाकरखेडे यांनी सुद्धा या रक्त तपासणी कार्यक्रम चा लाभ घेतला.

समाजकार्य बरोबर द पॉवर ऑफ मीडिया ही संघटना सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असल्याचे चित्र मागील 1 वर्षाच्या कालावधी पहायला मिळाले.यावेळी या कार्यक्रमला द पॉवर ऑफ मीडिया चे तालुका कार्यकारणी संदीप ढोले,नकुल सोनार,शशिकांत निचत,सुरज देवहाते,स्वप्नील डांगरे, परतवाडा कार्यकारणी अध्यक्ष पंकज साबु आणि बादल डकरे यांनी या कार्यक्रम च्या यशस्वी साठी प्रयत्न घेतले.यामध्ये जवळ पास 250 ते 300 नागरिकांनी याचा लाभ घेतला.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।