अ.भा.अंधश्रध्दा निर्मूलन समीतीच्या विलास ठोसर यांचे स्नेहसंमेलनात प्रबोधन

0
720
Google search engine
Google search engine

अंधश्रध्देचा आजार माणसे होती बेजार…

आकोटः ता.प्रतिनिधी

समाजात पसरलेल्या अंधश्रध्दा ह्या आजार असुन माणसांना बेजार करतात तेव्हा अशा अवास्तव गोष्टी पासुन जनतेने दूरच राहीलेलेच बरे असे चमत्कारासह प्रयोग करून माहीती देत आसताना सांगीतले. ते श्री शिवाजी विद्यालय आसेगांव बाजार,ता.अकोट,जि. अकोला. येथे आज दि.२७ डिसेंबर २०१९ रोजी श्री पंजाबराव देशमुख जयंती महोत्सव निमित्तने आयोजित प्रबोधन कार्यक्रमात बोलत होते अ.भा.अंधश्रध्दा निर्मूलन समीती शाखा अकोट चे वतीने विलास ठोसर व अरुण सांगळोदकर यांचे चमत्कार प्रयोगासह प्रबोधन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.अनिसचे अरूण सांगळूदकर यांनी ग्रहणाने माणसाला कुठलीही बाधा या इजा होत नाही तसेच प्रबोधनपर अंधश्रध्देवर अनेक उदाहरणे देत आपले वक्तव्य मांडले कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक कवी विठ्ठल कुलट यांनी केले कार्यक्रमाला शिक्षक वृंद ,मोठ्या संखेने विद्यार्थी व गावकरी यांची उपस्थिती होती.