नियमित कर्ज फेडणा-या शेतक-यांना लाभ मिळावा! -रमेश हिंगणकर

272

अकोटःसंतोष विणके

महाराष्ट्र विकास आघाडी शासनाने शेतकऱ्यांना २लाख रुपये कर्जमाफी देवून शेतक-यांना मोठा दिलासा दिला आहे.तसाच दिलासा नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना द्यावा. या योजनेत सहभागी करुन त्यांनाही १लाख रुपये आर्थिक मदत द्यावी व योजनेचा लाभ मिळावा.या बाबत शासनाने योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी अकोला जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठनेते रमेश हिंगणकर यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेवून दिलेला शब्द पाळला आहे.या योजनेत प्रामाणिकपणे प्रसंगी पदरमोड करुन कर्जाची परतफेड करणा-या शेतक-यांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण होवू नये.तसेच कर्जमाफी होत असेल तर कर्ज कां फेडावे अशी प्रतिकुल मानसिकता निर्माण होवू नये त्यासाठी नियमित कर्ज फेडणा-या शेतक-यांना किमान १लाख रुपये आर्थिक मदत मिळावी अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्वव ठाकरे, देशाचे नेते शरद पवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार,प्रांताध्यक्ष तथा अर्थमंत्री जयंत पाटील यांना पाठविले आहे.
————————-
मध्यम व दिर्घ मुदतीचे कर्ज माफ व्हावे
महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांचे २लाख रुपये पर्यंत पिक कर्ज माफ केले.त्यामध्ये शेतक-यांनी टॕक्टर,थ्रेशर,बोअर वेल,सिंचन,शेती अवजारे शेतीपूरक व्यवसायासाठी घेतलेले दिर्घ व मध्यम मुदतीचे थकीत कर्जाचा महात्मा फुले कर्जमाफी योजनेत समावेश करुन त्यांना दिलासा द्यावा.अशी मागणी देखील रमेश हिंगणकरांनी केली आहे.या संदर्भात सर्वपक्षीय शेतक-यांचे शिष्टमंडळ मा.मुख्यमंत्री व शिर्षस्थ नेत्यांना भेटणार असल्याची माहीती त्यांनी दिली.

जाहिरात