अकोट रोटरी क्लबच्या वतीने दि.1 व 2 जाने.रोजी मेमोग्राफी तपासणी शिबीर

0
903
Google search engine
Google search engine

आकोटः ता.प्रतिनिधी

अकोट शहरातील समाजसेवी संस्था म्हणुन नामांकीत असलेल्या अकोट रोटरी क्लबच्या वतीने दिनांक 1 जानेवारी 2020 रोजी बिलबिले मंगल कार्यालयात, नंदिपेठ रोड, अकोट येथे तथा 2 जानेवारी रोजी रोटरी नेत्र रुग्णालय येथे भव्य् मेमोग्राफी -कर्करोगाकरीता व गर्भाशय कर्करोगा करीता पॅपस्मीअर तपासणी शिबीराचे आयोजन स्व्. पांडुरंगजी रोडे व स्व्. महादेवराव शेगोकार स्मृती प्रितर्थ व सागर बोरोडे व मित्र परीवाराच्या संयुक्त विदयमाने करण्यात आलेले आहे. आजच्या हया धकाधकीच्या युगात तथा बदलती राहणीमान, विषारी भाजीपाला जीवनातील ताणतणाव तथा अनुवंशीकता हया मुळे स्त्रियांमध्ये कर्क रोगाचे प्रमाण वाढले आहे. स्त्रियांमध्ये नेहमी आढळणारे लक्षण म्हणजे पांढरे पाणी जाणे, मासीक पाळीत अतिरक्तस्त्राव होणे, गर्भाशयात गाढी होणे,अनियमित रक्त स्त्राव, स्तनामध्ये गाठ होणे, स्तनाच्या कातडीत बदल होणे हे सर्व कर्क रोगांचे प्राथमिक लक्षणे असुन त्याचे वेळेवर जर निदान झाले तर कर्करोग हा निश्चित बरा होणारा आजार आहे.हया् शिबीरामध्ये प्रथम वैद्यकीय तपासणी करण्यात येईल नंतरच आवश्यकते नुसार स्तनाची संपुर्ण तपासणी, गर्भाशयाच्या कॅन्सरकरीता पॅपस्मिअरची तपासणी, मेमोग्राफी तपासणी , दर महीन्यात करावयाची स्व:स्तनाची तपासणी प्रशिक्षण हया सेवा प्रदान करण्यात येतील. प्रत्येक स्त्रीने हया आजाराकरीता नेहमी प्रत्येक 1 ते 2 वर्षात नियमित मेमोग्राफी व पॅपस्मिअरची तपासणी करणे गरजेचे आहे त्याच अनुशंगाने संपुण्र भारत भर फिरणा-या हया नवनिर्मीत मेमोग्राफी बसची निर्मिती रोटरी क्लब ऑफ अमरावती मिडटाऊन व डॉ पंजाबराव देशमुख मेमोरिअल मेडीकल कॉलेज व्दारे करण्यात आलेली आहे. मेमाेग्राफी व पॅपस्मिअरची तपासणी करीता आपल्याला जवळपास 3500 रु खर्च लाभतो ते आपल्याला फक्त् नाममात्र शुल्कात करण्यात येणार आहे. तरी जागरुक महीलांनी हया शिबीराचा लाभ घ्यावा असे आव्हान रोटरी क्ल्बचे अध्यक्ष नंदकिशोर शेगोकार,सचिव शिरीष पोटे, प्रकल्प प्रमुख संजयजी बोराेडे, सागर बोराेडे, संदेश राेडे, सौ दिपाली रवींद्र केवटी व राेटरी सदस्यांनी केलेले आहे.शिबिरा करीता नाव नोंदणी अमर मेडिकल ,भुस्कट मेडिकल, शेतकरी मोटर्स, राजेश मेडिकल, रोटरी नेत्र रुग्णालय येथे सुरू आहे अशी माहीती रोटरीचे जनसंपर्क अधीकारी कल्पेश गुलाहे कळवितात.