सिंदेवाही च्या मिश्र क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद इंदिरा शाळेला

126
जाहिरात

सिंदेवाही : पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत येथ असलेल्या इंदिरा गांधी विद्यालय टेकरी (वानेरी ) शाळेत आयोजित वार्षिक क्रिडा सम्मेलन कार्यक्रमाच्या निमित्य शालेय स्तरावरील मिश्र क्रिकेट (मुले व मुली संयुक्त ) स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या स्पर्धेत इयत्ता 8 वि ,9 वि आणि 10 वि च्या क्रिकेट मिश्र संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता त्यामध्ये इयत्ता 9 वि च्या इंदिरा गांधी विद्यालय टेकरी संघाने बाजी मारून विजेते पदाचा पुरस्कार मिळविला. संघाचे कर्णधार प्राची भेंंडारे हिला सिंदेवाही पोलिस स्टेशनचे ठाणेदार निशिकांत रामटेके यांचे हस्ते क्रिकेट खेळाची सम्पूर्ण किट व प्रशस्तिपत्र वितरण देण्यात आले.
सदर मिश्र क्रिकेट टिम ची संकल्पना सिंदेवाही शिक्षण विभागातील शिक्षणतद्न्य प्रा. भारत मेश्राम यांची होती. प्रा .मेश्राम यांनी शाळेतील क्रिडा शिक्षकांना याबद्दल योग्य मार्गदर्शन केले होते आणि विजेत्या क्रिकेट संघाला देण्यात आलेली क्रिकेट किट ला त्यानी आर्थिक सहकार्य केलेले होते.
या विजेत्या संघात सहभागी खेळाळु म्हणुन कार्तिक सोनकर, आदित्यराज कावळे, अमन नागदेवते, गौरव वाघमारे, डिकेश गायकवाड, सावित्री भोयर, गायत्री नन्नावरे, प्रगती कन्नाके, तेजस्विनी कन्नाके व प्रचीता सोमेश्वर यांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेच्या यशवितेसाठी मुख्याध्यापक नन्नावरे, क्रिडा शिक्षक लोमेष अगडे आणि शालेय कर्मचारी नी परिश्रम घेतले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।